स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांची कारवाई. जिल्हा मध्यवर्ती बँक झरे येथील लॉकर गॅस कटरने कापुन केलेला चोरीचा गुन्हा उघड – ३,२५,५४,६००/- रु. चा मुद्देमाल हस्तगत. उत्तर प्रदेश व स्थानिक जिल्हयातील आरोपी जेरबंद.
प्रतिनिधी रणजीत मस्के
पोलीस स्टेशन आटपाडी पोलीस ठाणे
गु.घ.ता वेळ
दि. ०७/१/२०२६ रोजीचे सायकाळी १७.०० वा ते दि. ०८/०१/२०२६ रोजीचे सकाळी ०९.४५ वा चे पुर्वी.
अपराध क्र आणि कलम
गुरनं. ०८/२०२६ बीएनएस कलम ३३१(३),३३१ (४), ३०५ (अ) प्रमाणे
गु.दा.ता वेळ
दि.०८/०१/२०२६ रोजी
१७.३३ था
फिर्यादी नाव
हणमंत धोंडीचा गळवे, व्यवसाय शाखाधिकारी, रा. गळवेवाडी, आटपाडी.
माहिती कशी प्राप्त झाली
सपोनि. पंकज पवार, सपोनि. जयदिप कळकर, स्थनिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली.
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार
मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, श्री. सुनिल फुलारी, मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे,
मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर
यांचे मार्गदर्शानाखाली
पोलीस निरीक्षक संजीव झाडे, स्था. गु. अ. शाखा, सांगली,
सहा पोलीस निरीक्षक, पंकज पवार, स्था. गु. अ. शाखा, सांगली,
सहा पोलीस निरीक्षक, जयदिप कळेकर, स्था. गु. अ. शाखा, सांगली,
पोहया / सागर लवटे, संदीप नलावडे, सागर टिंगरे, रणजित जाधव, अमिरशा फकीर, नागेश खरात, अनिल कोळेकर, अतुल माने, सोमनाथ गुंडे, सतिश माने, मच्छिद्र बर्डे, दरिचा चंडगर, संदिप गुरव, उदय माळी, अमर नरळे, महादेव नागणे, अरुण पाटील, अमोल कदम, अमोल लोहार, प्रमोद साखरपे, पोशि / सुनिल जाधव, सुरज थोरात, केरुबा चव्हाण, विक्रम खोत, रोहन घस्ते, अभिजीत ठाणेकर, चापोहेका / शिवाजी सिद, स्था. गु. अ. शाखा, सांगली, पोकों / अभिजीत पाटील, अजय पाटील, साबचर पोलीस ठाणे, सांगली,
अटक ता. २१/०१/२०२६
आरोपीचे नांव पत्ता
१ ) राहुल रंजमीश शर्मा, वय २७ वर्षे, व्यवसाय ज्वेलरी दुकान रा. गाव ककराला, ता. जि. बधायु, राज्य उत्तर प्रदेश.
) विश्वजीत विजय पाटील, वय २४ वर्षे, व्यवसाय गलाई कामगार, रा. बांबवडे, ता पलुस, जि. सांगली.
२ ३) संकेत अरुण जाधव, वय २६ वर्षे, व्यवसाय कापड दुकान, रा. बलवडी, ता. खानापुर, जि. सांगली.
४) इजाज राजू आत्तार, वय ३० वर्षे, व्यवसाय पानपट्टी दुकान, रा. आमनापुर, ता. पलुस, जि. सांगली.१) १,५७,६८,०००/- किंमतीचे १.१६८ किलोग्रॅम वजनाचे सोन्याची लगड सिलबंद केलेले असे चा. या. भा. प्र. कि. अं.
२) ८७,००,०००/- किंमतीचे २८.५०० किलो ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने त्यात देवाचे मुखवटे, सोन्याचा मुलामा दिलेला कळस, हार, पैंजण, बाळे, गणपती मुर्ती, मुकूट, पंजे, घोडे, पाळणे, करदोडे, करंड, ताट, ग्लास, डोळे, मेखला, जोडवी, कंबरपट्टा, अंगठया असे चा. था. भा. प्र. कि. अं.
३) ७०,००,०००/- किमतीचे ५०३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्यात मंगळसुत्र, लक्ष्मीहार, मोहनमाळ, नेकलेस, बोरमाळ, चैन, बांगडया, बदाम, लॉकेट, १ ग्रॅमचा तीन पदरी हार असे चा. या. भा. प्र. कि. अं.
४) १०,००,०००/- किमतीची पांढऱ्या रंगाची महिंद्रा कंपनीची स्कोरपिओ तिचा आर टी ओ क्र. डी एल १० सौके ९२६८ असे जु. वा. किं. अं.
५) २६,०००/- किंमतीचा १ गावठी बनावटीचा कट्टा व ४ जिवंत राऊड असे जु.वा.कि अं.
६) ६,०००/- किंमतीचा काळया रंगाचा ऑक्सीजनचा मोठा वाटला असे णु. वा. कि. अं.
७) ५१,६००/- किंमतीच्या १००, ५०,२०,१० रु दराच्या भारतीय चलनी नोटा.
८) ३,०००/- रु किंमतीचा भारत गैस कंपनीचा ५ किलोचा निळया रंगाचा गॅस सिलेंडर असे जू. या. किं. अं.
३,२५,५४,६००/-रू. एकूण (तिन कोटी पंचवीस लाख चोपन्ना हजार सहाशे रुपये.)
गुन्हयाची थोडक्यात हकीकत :-
दि. ०७/१/२०२६ रोजीचे सायकाळी १७.०० वा ते दि. ०८/०१/२०२६ रोजीचे सकाळी ०९.४५ वा चे पूर्वी. अरे ता. आटपाडी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील पाठीमागील खिडकीची काच फोडुन खिडकीचे गज गैस कटरने कापुन आज प्रवेश करून लौकर रुममधील २२ लॉकर गैस कटरने तोडुन ग्राहकांनी ठेवलेले सोने चांदीचे दागिने व पैसे चोरी करून घेवून गेले होते. सदर बाबत फिर्यादीनी आटपाडी पोलीस ठाणेस वरील प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदरचा गुन्हा गंभीर असल्याने मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर श्री. सुनिल फुलारी यांनी गुन्हा उघडकीस आणणेबाबत सूचना दिल्या होत्या.
मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना वारवकर यांनी सदर गुन्हा घडले ठिकाणी भेट देवून गुन्हयाचावत सविस्तर माहिती घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांना सदर गुन्हयाच्या तपासाबाबत मार्गदर्शन करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.
सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, स्था. गु. अ. शाखा यांनी गुन्हा उघडकिस आणण्याच्या अनुशंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि सहा पोलीस निरीक्षक जयदिप कळेकर व स्टाफ यांची पथके तयार केली.
महाराष्ट्रात अशा प्रकारचे गुन्हे यापूर्वी कोठे घडले आहेत व त्यातील आरोपी सध्या कोठे आहेत याबाबत माहिती संकलित करुन त्यांचा या गुन्हयातील सहभाग तपासला गेला. परतुं त्यातून गुन्हा उघडकीस येणेसाठी आवश्यक ती माहिती प्राप्त झाली नाही.
आरोपींनी स्वतःचे अस्तित्व लपवणेबाबत बरीच काळजी घेतली असल्याने गुन्हयांची उकल करणे आव्हानात्मक झाले होते. घटनेच्या ठिकाणाहून फिर्यादी यांचे बैंकमधील सौसीटीव्हीचा डी.व्ही.आर आरोपीनी स्वतः सोबत नेला असल्याने आरोपीबाबत माहिती मिळण्यासाठी घटनास्थळ व आरोपीच्या येण्या जाण्याचा मार्ग निश्चित करुन तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करण्यात आला.
तसेच खास गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की पलुस येथे एका लॉजवर ७ ते ८ दिवसापासुन उत्तर प्रदेश येथील काही इसम राहण्यास आले होते. त्यांना राहण्याकरीता स्थानिक इसमांनी मदत केली होती. सदर बाबत पलुस येथे जावून खात्री केली असता महिती मिळाली की, विश्वजीत विजय पाटील, रा. बांबवडे हा उत्तर प्रदेश मध्ये गलाई चे दुकान होते त्याचे ओळखीच्या राहुल शर्मा यांने त्याचे उत्तर प्रदेश मधील इतर साथीदारांना घेवून आला होता. संकेत अरुण जाधव, रा. बलवडी, आणि इजाज राजु आत्तार, रा. आमनापुर, यांनी चोरी करणेकरीता लागणारे साहित्या पुरविलेअसल्याचे निष्पन्न झाल्याने लागलीच सपोनि पंकज पवार व सपोनि. जयदिप कळेकर यांची पथके उत्तर प्रदेश व दिल्ली राज्यात रवाना केली.
सपोनि पंकज पवार यांचे पथक तयार करून मिळाले बातमीचे अनुषंगाने अप्ररोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेणेकरीता उत्तर प्रदेश व दिल्ली राज्यात रवाना केले. पथकाने उत्तर प्रदेश येथे दाखल होऊन आरोपीवायत माहिती काढत असताना संशयीत आरोपी हा ककराळा, बधायुं येथे आला असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाली. त्याप्रमाणे दि.१९/०१/२०२६ रोजी आरोपीस स्थानिक पोलीसांचे मदतीने छापा मारत शिताफीने ताब्यात घेतले. आरोपीकडे नमुद गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा इतर साथीदारासह केला असल्याची कबुली देवून गुन्हात चोरी केलेला दागिन्याची लगड तयार केलेली हजर केली. त्यानंतर त्यास नमुद गुन्हयाचे कामी स्थानिक न्यायालयासमोर हजर केले असता मा. न्यायालयाने त्याची ४ दिवस ट्रांझीट रिमांड दिल्याने त्यास सांगली येथील मा. न्यायालयासमोर हजर करणेकरीता रवाना झाले आहेत.
तसेच सपोनि जयदिप कळेकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांचे पथकास माहिती मिळाली की, झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत लॉकर फोडून चोरी केलेले संशयीत इसम सोन्याचांदीचे दागिने विक्री करणेकरीता स्कॉरपिओ चार चाकी वाहनातून सांगलीवाडी येथे येणार असलेबाबत गोपनिय बातमीदाराकुडुन माहिती मिळाली.
नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे, फल्ले मंगलकार्यालय परीसरात सापळा लावून निगराणी करीत असता त्यांना एक पांढ-या रंगाची डीएल १० सीके ९२६८ नबरची स्कॉरापआ चार चाकी वाहन थांबलेले दिसले. त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना पळून जाणेची संधी न देता मोटार सायकलसह ताब्यात घेऊन त्यांना त्यांची नावे नाये गावे विचारले असता, त्यांनी त्यांची नावे अनुक्रमे १) विश्वजीत विजय पाटील, वय २४ वर्षे, व्यवसाय गलाई कामगार, रा. बांबवडे, ता पलुस, जि. सांगली. ३) संकेत अरुण जाधव, वय २६ वर्ष, व्यवसाय कापड दुकान, रा. बलवडी, ता. खानापुर, जि. सांगली. ४) इजाज राजु आत्तार, वय ३० वर्षे, व्यवसाय पानपट्टी दुकान, रा. आमनापुर, ता. पलुस, जि. सांगली असे असल्याचे सांगितले, सपोनि / जयदिप कळेकर यांनी मिळाले बातमीची हकीकत सांगुन त्यांना तेथे थांबण्याचे कारण विचारता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. तेव्हा सपोनि जयदिप कळेकर यांनी त्यांची व त्याचे ताब्यातील चार चाकी वाहनाची झडती घेतली असता, स्कॉरपिओ गाडीच्या ड्रायव्हर शिटच्या खाली पिशवीत सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून आली. ड्रायव्हरच्या डाचे बाजुस सीटचे समोरील ड्राव्हरमध्ये माकड टोपीमध्ये गावठी बनावटीचा कड्डा व ४ जिवंत राऊड मिळून आला. मधल्या सिटच्या जवळ ऑक्सीजनचा बाटला मिळुन आला आणि पाठीमागील शिटवर गॅसचा पाच किलोचा बाटला मिळून आला व पांढऱ्या प्लॅस्टीकच्या पोत्यात चांदीचे वेगवेगळे दागिने मिळुन आले. सपोनि जयदिप कळेकर यांनी त्यांचे ताब्यातील वाहनामध्ये मिळाले सोन्याचांदीचे दागिने व इतर साहित्याबाबत विचारणा केली असता समाधानकारक उत्तर दिले नाही. सपोनि जयदिप कळेकर यांनी विश्वजीत पाटील यास विश्वासात घेवून त्याचेकडे विचारणा केली असता, त्याने सांगितले की, १२ दिवसापूर्वी तो व त्याचे सोबत असलेला संकेत जाधय आणि इजाज आत्तार यांनी उत्तर प्रदेश येथे राहणारा राहुल शर्मा व त्याचे इतर साथीदार गेल्या १५ ते २० दिवसापासुन पलूस येथे लॉजधर राहणेकरीता आले होते. त्यांनी मिळून आटपाडी तालुक्यातील झरे गावातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या लॉकर रूममधील लॉकर स्कॉरपिओ गाडीतील गॅसच्या मदतीने जाळून त्यांतीन्ल सोन्या चांदीचे दागिने पैसे चोरून घेवून गेले होते. त्यातील थोडे सोने व चांदी ही स्कॉरपिओ मथे असून ती आज विक्री करणेकरीता सांगली गावात निघालो असल्याची कबुली दिली.
सदर घटनेचाबत आटपाडी पोलीस ठाणेचा क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच त्यांचे कब्जातील सोन्या चांदीचे दागिने, पैसे, गावठी कट्टा, जिवंत राऊड, गॅसचे बाटले व गुन्हा करताना वापरलेली गुन्हयातील चार चाकी वाहन पुढील तपास कामी सपोनि. जबदिप कळेकर यांनी पंचासमक्ष जप्त केली आहे. राहुल शर्मा याचे इतर साथीदार यांचा माहिती काढून त्यांना अटक करीत आहोत. रण्याची तजवीज ठेवली आहे.
सदरचे आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी आटपाडी पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास आटपाडी पोलीस ठाणे करीत आहेत.








