एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

परभणी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक

परभणी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक
परभणी. श्रीहारी अंभोरे पाटील. निवडणूक-2026निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, पोलीस यंत्रणा सज्ज
जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण
मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे
दि. 5 फेब्रुवारी रोजी मतदान तर 7 फेब्रुवारी मतमोजणी
परभणी – राज्य निवडणुक आयोगाने दि. 13 जानेवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने आदर्श आचसासंहिता लागू करण्यात आली आहे. परभणी जिल्हयात 54 तर पंचायत समितीच्या 108 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे, निवडणुकीसाठी प्रशासन, जिल्हा परिषद व पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून मतदारांनी निर्भयपणे दि. 5 फेब्रुवारीरोजी आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनिता भालेराव, तहसीलदार (सामान्य प्रशासन) रामदास कोलगणे आदींसह पत्रकार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विविध समित्यांतंर्गत नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य निवडणुक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणूक कार्यक्रमाच्या सूचनेची प्रसिद्धी- 16 जानेवारी 2026, नामनिर्देशनपत्र स्वीकारणे- 16 जानेवारी ते 21 जानेवारी 2026, नामनिर्देशनपत्रांची छाननी- 22 जानेवारी, उमेदवारी माघारीची अंतिम मुदत- 27 जानेवारी, निवडणूक चिन्ह वाटप- 27 जानेवारी, अंतिम उमेदवारांची यादी- 27 जानेवारी आहे. मतदानाचा दिनांक- 5 फेब्रुवारी 2026 तर मतमोजणी 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. दि. 1 जुलै 2025 हा मतदार यादी ग्राह धरण्याचा दिनांक आहे.
जिल्हयात एकूण ग्रापंचायती 705 असून गटांची संख्या 54 तर गणांची संख्या 108 आहे. मतदान केंद्रांची संख्या 1278 आहे. एकूण मतदारांची संख्या 10 लाख 42 हजार 957 आहे. यामध्ये पुरुष मतदार 5 लाख 39 हजार 998, स्त्री मतदार 5 लाख 2 हजार 954 तर तृत्तीयपंथीय मतदारांची संख्या 5 आहे. तहसिलदारस्तरावर बीएलओ मार्फत दुबार मतदारांची पडताळणी करण्यात आली असून दुबार मतदारांबाबत आयोगाने विहित केल्या प्रमाणे हे मतदार कुठे मतदान करणार आहेत, याबाबत आवाहन करुन त्यांच्याकडून लेखी माहिती घेतली जाईल. मतदानासाठी आवश्यक मतदान यंत्र उपलब्ध होणार आहेत. निवडणुक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली आहे.
मतदान केंद्रांवर मतदारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या जातील. दिव्यांग व जेष्ठ मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे यासाठी रॅम्पची व्यवस्था असेल. स्वीप कार्यक्रमातंर्गत मतदानासाठी मोठया प्रमाणात जनजागृती केली जाईल. मतदारांनी आपला मतदानाचा अमूल्य हक्क अवश्य बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
उमेदवारांसाठी खर्च मर्यादा -जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांना खर्च मर्यादा पुढील प्रमाणे असेल, 50 ते 60 निवडणूक विभाग (गट) असलेल्या जिल्हा परिषदेसाठी 6 लाख आणि त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांसाठी (गण) 4 लाख 50 हजार रुपये खर्च मर्यादा आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link