बनावट नियुक्तीपत्राने नरसिंह विद्यामंदिर उमरदरी व नांदेडच्या शाळेत अकरा शिक्षक कार्यरत शिक्षण विभाग डोळे झाकून
नांदेड सखाराम कुलकर्णी
नांदेड -बोगस शालार्थ आयडी, बोगस नियुक्त्या प्रकरण राज्यात गाजत असले तरी नरसिंह विद्यामंदिर उमरदरी व नांदेडच्या शाळेत बनावट नियुक्ती आदेशावर तब्बल ११ शिक्षक कार्यरत असून शैक्षणिक कार्य करतात. याकडे नांदेडच्या शिक्षण विभागाने डोळे झाकून गैर नियुक्त्यांना उत्तेजन दिल्याचे दिसते.
वादाच्या व चर्चेच्या भवऱ्यात असलेली जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी संस्थेच्या सन २०१२नंतरच्या २० ते २२ शिक्षकांच्या नियुक्त्यांची चौकशी एस.आय.टी. कडे व शिक्षण संचालक पुणे यांचेकडे चालू आहे. सन २०१७ नंतर तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी बोगस नियुक्त्यांना मंजुरी दिल्यात .तसेच विनाअनुदानित वरून अनुदानित वर बदल्या करून शालार्थ आयडी दिल्यात .हे प्रकरण गाजत असताना आता पुन्हा बनावट नियुक्तीं आदेशाचे प्रकरण उजेडात आले. बनावट नियुक्ती आदेश व बोगस नियुक्त्यावर नरसिंह विद्यामंदिर उमरदरी ता. मुखेड या शाळेत १}व्ही .आर. कारगळे २} एस. जी. कोठारे ३} श्रीमती एस. बी. वाघमारे ४}एस. बी. मुखेडकर ५} कें.व्ही. पांचारे ६}जी.एस सुरेवाड ७}एस. व्ही. पुंडे ८} एस. ए. काझी तर नरसिंह विद्यामंदिर महावीर सोसायटी नांदेड या शाळेत १} पी.जी. भंडारे २}एम. बी. गोकुळे ३} ए. एम. मठपती असे एकूण ११ प्राध्यापक व शिक्षक तसेच याच संस्थेच्या शिवाजी विद्यालय सिडको नांदेड शाळेतही पाच-सहा प्राध्यापक बेकायदेशीर नियुक्त्याने शाळेत कार्यरत आहेत. या शिक्षकांपैकी काही शिक्षक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे नातेवाईक असल्याचे बोलले जाते .म्हणून या शाळेच्या गैर कारभाराकडे शिक्षण विभाग डोळेझाक करतो. अशी चर्चा शिक्षण विभागात होत असते. शिक्षण विभागाची वैयक्तिक मान्यता नसताना तसेच पवित्र पोर्टल द्वारे नियुक्ती नसताना हे कर्मचारी शाळेच्या मस्टरवर नाव लिहून रोज सह्या करतात व शैक्षणिक कार्य करतात. तर शाळा तपासायला गेलेले शिक्षण विभागाचे अधिकारी डोळे झाकून घेतात ,की आर्थिक तडजोडीवर गप्प बसतात. हा प्रश्न आहे .वास्तविक जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी ता. मुखेड या संस्थेची अधिकृत कार्यकारिणी सन २०१५पासून अस्तित्वात नाही .तर यातील काही शिक्षकांनी व प्राध्यापकांनी सन २०१९,२०२० व २०२४ ची नियुक्ती आदेश कोठून आणलीत. बनावट आदेश देण्याचे नांदेड मध्ये रॅकेट आहे का हा प्रश्न समोर येतो. व असे शिक्षक बनावट सहीचे बनावट आदेश तयार करून शाळेत उपस्थित राहतात. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार केला तर मान्यता नसलेल्या कर्मचाऱ्यांमुळे शाळेत कोणतीही अनुचित घटना घडल्यास, शिस्तभंग झाला तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा बेकायदेशीर नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांचे नाव हजरीपटावरून त्वरित कमी करावे व त्यांना शाळेत येण्यास बंदी करून त्यांचे विरुद्ध गुन्हे दाखल करावे अशी मागणी एका पत्राद्वारे सखाराम कुलकर्णी यांनी शिक्षणाधिकारी नांदेड यांच्याकडे केली .यावर शिक्षणाधिकारी आपले डोळे उघडून कारवाई करतील का व काय कारवाई करतील .याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.







