📰 ब्रेकिंग न्यूज: विजय अंभोरे यांना विधान परिषदेची आमदारकी द्यावी – मातंग समाजाची शिंदे गटाला विनंती
अजिंक्य महाराष्ट्र प्रतिनिधी । रवि बावसकर
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील मातंग समाजाचे प्रामाणिक कार्यकर्ते आणि शिंदे गटातील निष्ठावान पदाधिकारी विजय भाऊ अंभोरे यांनी, आमदार संजय भाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील नगर पालिका निवडणुकीत अत्यंत मोलाची भूमिका बजावत विजयात सिंहाचा वाटा उचलला आहे. अंभोरे यांनी खांद्याला खांदा लावून केलेल्या प्रयत्नांमुळेच शिंदे गटाला निवडणुकीत मोठे यश प्राप्त झाले, असे बोलले जात आहे.
मातंग समाजाने आता विजय अंभोरे यांच्या कामाची दखल घेऊन, त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी देण्यात यावी अशी जोरदार मागणी केली आहे. प्रामाणिक आणि तळमळीने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिल्यास समाजाला न्याय मिळेल आणि पक्षाची ताकद आणखी वाढेल, अशी भूमिका मातंग समाजाने घेतली आहे.
विजय अंभोरे हे मातंग समाजातून येतात आणि त्यांचे सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील योगदान मोठे आहे. नगर पालिका निवडणुकीत त्यांनी घेतलेले कष्ट, संघटन कौशल्य आणि पक्षाप्रतीची निष्ठा वाखाणण्याजोगी आहे. त्यामुळे, आमदार संजय भाऊ गायकवाड यांनी अंभोरे यांच्या नावाची शिफारस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करावी, अशी अपेक्षा मातंग समाजाने व्यक्त केली आहे.
मातंग समाजाची ही विनंती शिंदे गट आणि पक्ष नेतृत्वाने गांभीर्याने घेऊन विजय अंभोरे यांच्या कार्याचा उचित सन्मान करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.







