एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

अंबड तहसीलदारांची वाळू माफियांवर ‘सर्जिकल स्ट्राईक

अंबड तहसीलदारांची वाळू माफियांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’; चांभारवाडीत फिल्मी स्टाईलने पाठलाग करणाऱ्यांचा डाव फसला
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई; ट्रॅक्टर, दुचाकी आणि मोबाईल जप्त; वाळू तस्करांचे धाबे दणाणले
अंबड (दि. २७): अंबड तालुक्यातील चांभारवाडी येथील दुधना नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे. दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी केलेल्या या कारवाईत एक ट्रॅक्टर, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि तीन मोबाईल जप्त करण्यात आले असून, महसूल पथकाची रेकी (पाळत) करणाऱ्यांचा पर्दाफाश करण्यात आला आहे. ही कारवाई जालना जिल्ह्याच्या माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल मॅडम, माननीय अप्पर जिल्हाधिकारी श्री. मिसाळ सर आणि माननीय उपविभागीय दंडाधिकारी श्री. उमाकांत पारधी सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून प्रशासनाने वाळू माफियांविरोधात उघडलेली मोहीम यापुढेही अशीच सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
नेमकी घटना काय?
मागील काही दिवसांपासून चांभारवाडी (ता. अंबड) येथून अवैध वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या अनुषंगाने ग्राम महसूल अधिकारी स्वप्निल खरात, महसूल सहाय्यक श्याम विभुते आणि महसूल सेवक विकास डोळसे यांचे पथक मौजे चांभारवाडी येथे गेले होते.
पथक कारवाईसाठी जात असतानाच वाळू तस्करांचे साथीदार करण गणेश शिंदे व सनी हिवाळे हे महसूल पथकाचे ‘लोकेशन’ घेण्यासाठी दुचाकीवरून त्यांचा पाठलाग करत असल्याचे लक्षात आले. याच दरम्यान, ऋषी गणेश शिंदे याने त्याच्या मामाच्या मुलाचे ट्रॅक्टर वापरून विनापरवाना १ ब्रास वाळू वाहतूक केली होती. महसूल पथक येत असल्याची चाहूल लागताच त्याने मौजे आलमगाव येथे वाळू खाली केली आणि ट्रॅक्टर आलमगाव रोडवर आणून उभे केले.
तहसीलदारांची एन्ट्री आणि पुरावे
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पथकाने तात्काळ तहसीलदार विजय चव्हाण यांना संपर्क साधला. त्यानंतर तहसीलदार विजय चव्हाण आणि अव्वल कारकून रमेश वालेकर हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. संयुक्त पथकाने ट्रॅक्टरची बारकाईने पाहणी केली असता, ट्रॉलीला वाळू चिटकलेली आढळून आली.
मोबाईलमध्ये दडले आहे मोठे रॅकेट
या कारवाईत ऋषी गणेश शिंदे, करण गणेश शिंदे व सनी हिवाळे यांचे तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या मोबाईलच्या तपासणीत धक्कादायक माहिती समोर आली आहे:
* मोबाईलमध्ये महसूल पथकाचे लोकेशन शेअर केल्याचे पुरावे.
* वाळूच्या ऑर्डर्स, वाहतूक आणि उत्खननाचे कॉल रेकॉर्डिंग, फोटो आणि व्हिडिओ.
* यावरून हे रॅकेट गेल्या अनेक दिवसांपासून सक्रीय असून यात अनेक लोकांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. तपासादरम्यान रोहित संजय जगताप (रा. घोटण) हा व्यक्ती जेसीबीद्वारे वाळू उत्खननासाठी मदत करत असल्याचेही निष्पन्न झाले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व पुढील दिशा
सदरची कारवाई माननीय जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल मॅडम, माननीय अप्पर जिल्हाधिकारी श्री. मिसाळ सर आणि माननीय उपविभागीय अधिकारी श्री. उमाकांत पारधी सर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पातळीवरून अवैध गौण खनिजाबाबत ‘झिरो टॉलरन्स’ धोरण अवलंबण्यात आले असून, अशा प्रकारच्या सख्त कारवाया यापुढेही निरंतर सुरू राहणार आहेत.
जप्त मुद्देमाल व पथक:
अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर, रेकीसाठी वापरलेली दुचाकी आणि ३ मोबाईल जप्त करून अंबड तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहेत. तहसीलदार विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अव्वल कारकून रमेश वालेकर, ग्राम महसूल अधिकारी स्वप्निल खरात, महसूल सहाय्यक श्याम विभुते आणि महसूल सेवक विकास डोळसे यांनी ही कामगिरी बजावली.

> प्रतिक्रिया:
> “वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तालुक्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात कडक मोहीम राबविली जात आहे. शासकीय कामात अडथळा आणणे किंवा अधिकाऱ्यांची पाळत (रेकी) करणे खपवून घेतले जाणार नाही. वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रशासनाच्या या सख्त कारवाया (Sapt Karvaya) यापुढेही अविरत सुरूच राहतील.”
> – विजय चव्हाण
> तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, अंबड
>

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link