एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

नागपूर शहर पोलिस परिमंडळ क्र.4 यांच्याकडून प्रभावी कारवाई

नागपूर शहर पोलिस – परिमंडळ क्र.-4 यांच्याकडून प्रभावी कारवाई. नववर्ष व मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष कोम्बिंग ऑपरेशन – 149 आरोपींवर कारवाई

 

नागपूर शहरातील परिमंडळ क्र.-4 अंतर्गत 27 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025 दरम्यान नववर्ष व आगामी मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष कोम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली.

 

या विशेष मोहिमेदरम्यान परिमंडळातील सर्व पोलीस ठाण्यांमार्फत रात्री 19.00 ते 23.00 वाजेपर्यंत सघन तपासणी व कारवाई करण्यात आली.
ठळक कारवाई (आकडेवारी):

▪️ 149 संशयित/आरोपींची तपासणी
▪️ 193 संशयित वाहने तपासण्यात आली
▪️ 4 अवैध शस्त्रे जप्त
▪️ 13 प्रकरणांत अवैध दारू विक्रीवर कारवाई
▪️ 6 प्रकरणांत अमली पदार्थ सेवनाबाबत कारवाई
▪️ 53 प्रकरणांत उघड्यावर दारू पिणाऱ्यांवर कारवाई
▪️ 2 जुगार प्रकरणांवर कारवाई
▪️ 1 तडीपार आरोपीवर कारवाई
▪️ दारू पिऊन वाहन चालविण्याबाबत 13 प्रकरणात प्रभावित कारवाई करण्यात आली आहे.
यामध्ये विशेषता.
हुडकेश्वर, नंदनवन, इमामवाडा, अजनी, सक्करदरा व बेलतरोडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही कारवाई प्रभावीपणे राबविण्यात आली. सदर कारवाई मध्ये पोलीस उपस्थिती
/या मोहिमेसाठी पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक चार सह 01 सहा. पोलीस आयुक्त, 03 पोलीस निरीक्षक, 10 अधिकारी व 50 अंमलदार तैनात होते.

पोलिसांकडून नागरिकांना संदेश सूचना.

नागरिकांच्या सुरक्षिततेस बाधा निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असून, दारू, अमली पदार्थ, अवैध शस्त्रे व गुन्हेगारी प्रवृत्तीविरुद्ध झिरो टॉलरन्स धोरण अवलंबिले जात आहे.

 

नववर्ष व मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ क्र.-4 नागपूर पोलिसांचे विशेष कोम्बिंग ऑपरेशन!

✔️ 149 आरोपी तपास
✔️ 193 वाहने चेक
✔️ अवैध दारू, शस्त्रे, अमली पदार्थांवर कठोर कारवाई
✔️ उघड्यावर दारू पिणाऱ्यांवर 53 कारवाया..

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नागपूर पोलिस सदैव सज्ज!

याप्रमाणे विशेष कोंबिंग ऑपरेशन राबवून येणारे नववर्ष व मनपा यासाठी केलेले व समाजामध्ये शांतता सुव्यवस्था राहण्यासाठी केलेली कारवाई वरील प्रमाणे आहे..

सविनय सादर आहे. पो.उपायुक्त परिमंडळ क्रमांक चार नागपूर शहर.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link