एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

आपला गाव-आपला विकास करणे आपले कर्तव्य – सरपंच प्रमिला शितोळे

आपला गाव-आपला विकास करणे आपले कर्तव्य – सरपंच प्रमिला शितोळे

 

पुणे सहसंपादक :-गणेश महाडिक

 

हवेली शिंदवणे रविवार, दि. २८ डिसेंबर, २०२५ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळेशिवार शिंदवणे, ता. हवेली, जि. पुणे येथे जिल्हा परिषद पुणे आणि पंचायत समिती हवेली आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत केवायसी शिबीर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शिबीरात काळेशिवार, शितोळे मळा, पांचाळा, कॅनल परिसर, खेडेकर मळा, मचाले वस्ती, धारक वस्ती, वाकवस्ती, आंब्याचा मळा येथील शेकडो नागरिकांनी लाडकी बहिण योजना केवायसी, आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करणे, आधार कार्ड पत्ता बदलणे, नवीन मतदार ओळखपत्र काढणे आदी आवश्यक कागदपत्रांचा लाभ घेतला.
या शिबिराचे उद्घाटन विद्यमान सरपंच प्रमिला शितोळे आणि माजी सरपंच तथा विद्यमान सदस्या सारीका दिनानाथ महाडीक यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करुन वंदन करण्यात आले.
याप्रसंगी बहुजन समाज पार्टीचे शिरुर-हवेली विधानसभेचे उपाध्यक्ष प्रा. सदाशिव कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे पुरंदर तालुका अध्यक्ष बळीराम सोनवणे, कार्याध्यक्ष कालिदास उबाळे, जिजाऊ महिला ब्रिगेड पुणे जिल्हा उपाध्यक्षा स्मिता भाऊसाहेब शिंदे, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एडव्होकेट राजेंद्र कांचन, समाज सेवक कचरु शितोळे, हेमंत गाडेकर, सोमनाथ खेडेकर, शंकर जराड, भाऊसाहेब शिंदे, पत्रकार अमोल महाडीक यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना विद्यमान सरपंच प्रमिला शितोळे म्हणाल्या की, आपला गाव-आपला विकास करणे हे आपले कर्तव्य व जबाबदारी आहे. नागरिकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला पाहिजे. ग्रामपंचायतचे विविध कर हे वेळेवर भरावेत. आजचा कार्यक्रम मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत काळेशिवार येथे राबवला त्यामुळे स्थानिक नागरिकांची सोय झाली तसेच गावातील लोकांची जीवनावश्यक कागदपत्रांची सोय झाली. अभियानात सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल काळेशिवार परिसरातील नागरिकांचे मी आभार मानते, असे मत शितोळे यांनी बोलताना व्यक्त केले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link