एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

परशुराम बाबुराव लोखंडे या छत्रपतींच्या मावळ्याच्या २० वर्षापासूनच्या एकाकी लढ्याला मोठे यश.

परशुराम बाबुराव लोखंडे या छत्रपतींच्या मावळ्याच्या २० वर्षापासूनच्या एकाकी लढ्याला मोठे यश.

पुणे उप संपादक गणेश राऊत

पुणे दि १२ : ज्येष्ठ समाजसेवक मा. अण्णासाहेब हजारे अण्णांचे आशिर्वाद आणि मार्गदर्शनाखाली दि. ०९/१२/२०२५ रोजी नागपूर हिवाळी अधिवेशना दरम्यान केलेल्या उपोषणाचे फलीत झालेने परशुराम लोखंडे हे मागील २० वर्षापासून पोलीस बांधव व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणकारी मागण्यांसाठी लढा देत होते त्याला कुठेतरी यश आले त्यासाठी त्यांनी उपोषणादरम्यान खालील प्रमाणे राज्यातील पोलीस सेवेतील मागण्या केल्या होत्या
१) कुटुंब आरोग्य योजनेचा लाभ हयातीपर्यंत मिळावा.
२) पोलीसांच्या आठ तासाच्या ड्युटीचा शासन निर्णय जाहीर करावा.
३) २०१३ च्या विभागीय पीएसआय परीक्षेतील उत्तीर्ण पोलीसांना त्वरित प्रभावाने पीएसआय पदी पदोन्नती द्यावी.
४) बिआयटी. चाळीत तसेच पोलीस वसाहतीत शासकीय निवासस्थानात राहणाऱ्या पोलीसांना आर्थिक मोबदला घेऊन ती घरे मालकी हक्काने देण्यात यावीत.
५) बदल्यांच्या धोरणात सुधारणा करण्यात यावी.
६) साप्ताहिक सुट्टी व नैमित्तिक रजा वेळेच्या वेळी देण्यात याव्यात व इतर मागण्या तसेच

आग्रीपाडा बी आय टी चाळीतील जेष्ठ महिला श्रीमती भारती साळवी व इतर रहिवाशांवर बिल्डर ऋषभ जैन कडून होणारा अन्याय दूर करावा

या मागण्यासाठी परशुराम लोखंडे यांनी नुकतेच ९ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनाचे वेळी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते.
त्यात त्यांना मोठे यश आले असून,
मा. मुख्यमंत्री यांच्या बैठकीत मुंबईतील पोलीस वसाहतीतील शासकीय निवासस्थानात राहणाऱ्या पोलीसांना मालकी हक्काने घरे देण्याचे मा. सभापतींचे संकेत दिले आहेत.
याबाबत बोलताना परशुराम लोखंडे म्हणाले की, मी एकटाच नाही तर याकामी हिंदवी स्वराज्य ट्रष्ट राळेगण सिद्धी,यशोदा माहिती अधिकार प्रशिक्षण संस्था पुणे मुंबई पोलीस संघटना इतर संस्था, संघटना पाठीशी लढा देण्यासाठी उभ्या होत्या हे यश सर्वांचंच आहे.या सर्वांनी इथंच न थांबता पोलीस व समाजाच्या कल्याणासाठी सतत लढा दिला पाहिजे. तसेच ते पुढे म्हणाले की, ज्येष्ठ समाजसेवक
मा. अण्णा हजारे यांचे आशीर्वाद तसेच यशोदा माहिती अधिकार संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष खंडुअण्णा गव्हाणे, राष्ट्रीय लोक अदालत, पुणे. न्यायाधीश मा. उमरगे अण्णा, धडाडीच्या पत्रकार श्रीमती,अनघालक्ष्मीदुर्गा या सर्वांच्या मौलिक मार्गदर्शन आणि सहकार्यामुळेच हे यश लाभले आहे.

परशुराम लोखंडे यांनी शासकीय निवासस्थानात राहणाऱ्या सर्व पोलीसांना आवाहन केले आहे की, आता पुन्हा एकदा दिवाळी साजरी करा, आपापल्या दारात रांगोळी काढा, दिवे लावा आणि लागोलाग रहाते निवासस्थान आपल्या मालकी हक्काने आपल्या नावावर करण्यासाठी पुढच्या तयारीला लागा.

मुंबईतील प्रत्येक पोलीस वसाहतीतील कर्तव्यावरील पोलीस खेरीज करून,पत्नी मुलं या सर्वांनी एकत्र येऊन प्रत्येक मजल्यावरील दोन तीन जणांची मिळून एक कमिटी तयार करावी.
यातील दोघांना प्रमुख नेमून या दोन दोन जणांची संपूर्ण मुंबईची एक मुख्य कमिटी तयार करण्यात यावी. या कमिटीद्वारे संपूर्ण मुंबईतील पोलीस वसाहतिचे अर्ज माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना सादर करावे असे त्यांच्या मुलाखती वेळी त्यांनी कळविले.!

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link