भारती विद्यापीठ पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुस्क्या
प्रतिनिधी अनघलक्ष्मी दुर्गा
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर
अपहरण करुन गंभीर गुन्हा दाखल करण्याची धमकी देवुन खंडणी उकाळणा-या आरोपींना केले जेरबंद
दि.०७/१२/२०२५ ते दि.०८/१२/२०२५ रोजी फिर्यादी यास गुन्हयातील मुलीने कात्रज चौकात भेटायला बोलवुन घेवुन त्यांचे सोबत बाईकवरुन कात्रज घाटाकडे जात असताना नमुद महीलेचे साथीदार यांनी फिर्यादी यांना थांबवुन धमकी देवुन फिर्यादी यांना जबरदस्तीने येवलेवाडी येथे घेवुन जावुन त्या ठिकाणी सर्वांनी मिळून फिर्यादी यांना शिवीगाळ व हाताने मारहाण करुन पोक्सो अंर्तगत गुन्हा दाखल करण्याची धमकी देवुन तसे न करण्यासाठी ७०,०००/- रुपयेची मागणी करुन त्यापैकी खंडणी म्हणुन रोख रुपये १०,०००/- घेवुन उर्वरीत खंडणीचे रक्कमेसाठी सतत फोन करीत आहेत म्हणुन फिर्यादी यांचे तक्रारीवरुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ५५६/२०२५,मा.न्या.सं.क.३०८ (२), ३०८ (३),१४० (२), ११५ (२), ३५१ (२), ३५२.३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्यामुळे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे यांनी गुन्हयातील आरोपींचा शोध घेणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, मंगेश गायकवाड, तुकाराम सुतार हे आरोपींचा शोध घेत असताना त्यांचेकडुन मिळालेल्या बातमीवरुन दाखल गुन्हयामध्ये आरोपी १. अक्षय गंगाधर बुधेवार, वय-२२ वर्षे, रा. गोकळनगर, कात्रज, पुणे. २. अमोल अंकश शिंदे, वय-२८ वर्षे, रा. कर्वेनगर, कोथरूड, पणे. ३. राहुल तानाजी शितोळे, बय-२३ वर्षे, रा. फलॅट नं.१०५, लंबोदर अपार्टमेंट, महादेवनगर, शेलार मळा, कात्रज, पुणे यांना दिनांक १०/१२/२०२५ रोजी अटक करण्यात आली असुन, गुन्हयात्तील विधीसंघर्षीत मुलीस ताब्यात घेण्यात आले आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास सहा. पो. निरीक्षक थोरात हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ श्री. मिलींद मोहीते, मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्री. राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे, यांचे सुचनेप्रमाणे सहा. पो. निरी. स्नेहल थोरात, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार, नागेश पिसाळ, महेश बारवकर, मंगेश पवार, नवनाथ खताळ, मंगेश गायकवाड, तुकाराम सुतार, किरण साबळे, मितेश चोरमोले, संदीप आगळे, सचिन सरपाले, निलेश सखैरमोडे, अभिनय चौधरी, सागर बोरगे, यांच्या पथकाने केली आहे.








