परशुराम बाबुराव लोखंडे, मुंबई पोलीस समिती अध्यक्ष, सनय छत्रपती शासन पक्ष, यांची कौतुकास्पद कामगिरी.
प्रतिनिधी अनघलक्ष्मी दुर्गा
पुणे दि ११ : यशवंत स्टेडियम नागपूर या ठिकाणी जवळजवळ २५ ते ३० विविध संस्था संघटनांची आंदोलने चालू असून प्रत्येक आंदोलनामध्ये २०० ते ३०० आंदोलनकारी यांची उपस्थिती आहे. मात्र याला एक अपवाद देखील आहे. आणि तो अपवाद म्हणजे सनई छत्रपती शासन पक्षाच्या मुंबई पोलीस समितीचे अध्यक्ष परशुराम बाबुराव लोखंडे.
नागपूरच्या कुडकुडणाऱ्या थंडीमध्ये आणि तळपत्या उन्हामध्ये आज दिनांक ०९/१२/२०२५ रोजी पहाटे साडेनऊ वाजल्यापासून परशुराम लोखंडे हे पोलीस बांधव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणकारी मागण्यासाठी
छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा, एकटा शिलेदार म्हणून लढा देत आहेत. जोडीला कोणीही नसताना हा असा एकाकी लढा देणं अत्यंत कौतुकास्पद आहे.
त्यांच्या मागण्या खालील प्रमाणे आहेत.
१) पोलीसांचे कर्तव्य आठ तासाचे करावे यासाठी त्वरित प्रभावाने शासन निर्णय जारी करण्यात यावा. आठ तासापेक्षा जास्त ड्युटी केल्यास प्रत्येक तासागणित आर्थिक मोबदला देण्यात यावा.
२) कुटुंब आरोग्य योजनेचा लाभ हयातीपर्यंत मिळावा.
३) मनपा कर्मचाऱ्यांना मिळते तशीच सुविधा पोलीसांना व त्यांच्या कुटुंबीयांना मनपाचे व खाजगी रुग्णालयात मिळावी.
४) सन २०१३ च्या विभागीय पीएसआय परीक्षेतील उत्तीर्ण पोलीसांना त्वरित पीएसआय पदी पदोन्नती देण्यात यावी.
५) पोलीसांच्या बदल्यांच्या धोरणात सुधारणा करण्यात यावी.
६) साप्ताहिक सुट्टी व नैमित्तिक रजा वेळच्यावेळी देण्यात यावी.
७) पोलीसांना शासकीय निवासस्थानाचे वाटप न करता त्यांना स्वतःच्या मालकी हक्काचे निवासस्थान वाटप करण्यात यावे व त्यांच्या वेतनातून सदर निवासस्थानाचा मासिक हप्ता कापण्यात यावा.
८) बीआयटी चाळीतील तसेच पोलीस वसाहतीत राहत असलेल्या पोलीसांच्या खोल्या आर्थिक मोबदला घेऊन मालकी हक्काने त्यांच्या नावे करण्यात याव्यात.
९) आग्रीपाडा बीआयटी चाळीतील ज्येष्ठ महिला श्रीमती भारती साळवी व इतर रहिवाशांवरील ऋषभ जैन बिल्डर कडून होणारा अन्याय दूर करावा
परशुराम लोखंडे हे एकाकी लढा देत आहेत त्याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की,
मला तमा नाही
माझ्या मागे किती, सवे किती आहेत
माझ्या हृदयात, माझ्या छातीवर अन्
माझ्यासोबत खुद्द छत्रपती आहेत.!
असे सांगण्यात आले







