एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

श्री गणेश दत्तात्रय बच्छाव यांची थेपडे विद्यालय,म्हसावद येथे प्राचार्य पदावर नियुक्ती

श्री गणेश दत्तात्रय बच्छाव यांची थेपडे विद्यालय,म्हसावद येथे प्राचार्य पदावर नियुक्ती

जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील

ब.ग. विश्वस्त निधी,अडावद या संस्थेच्या स्वा.सै.पं.ध.थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,म्हसावद येथे श्री गणेश दत्तात्रय बच्छाव यांची १ डिसेंबर २०२५ पासून प्राचार्य पदावर संस्थेचे चेअरमन मा.श्री केदारजी थेपडे व सर्व विश्वस्त मंडळ यांनी नियुक्ती केली. २८ वर्षापासून गणेश बच्छाव सर शाळेत सेवेत असून ४ वर्षापासून उपमुख्याध्यापक पदाची जबाबदारी सांभाळत होते. मागील १५ वर्षापासून जळगाव जिल्ह्यात इंग्रजी विषयाचे तज्ञ मार्गदर्शक ,मेंटॉर तसेच राज्यस्तरीय निवड श्रेणी प्रशिक्षक म्हणून देखील कार्य करत आहे. English Teachers’ Welfare Association Jalgaon (ETWAJ) संस्थेचे सचिव पदावर कार्यरत आहेत.
श्री गणेश बच्छाव यांची थेपडे विद्यालयाच्या प्राचार्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल संस्थेची चेअरमन मा. श्री केदारजी थेपडे, श्री पी डी चौधरी, मुख्याध्यापक नूतन ज्ञान मंदिर अडावद, उपमुख्याध्यापक श्री एस के भंगाळे, पर्यवेक्षक श्री के पी पाटील, शिक्षक प्रतिनिधी श्री सचिन चव्हाण, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख श्री योगराज चिंचोरे, शाळेचे लिपिक श्री विजय वाघ, पंकज काटकर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सकाळ पेपर चे विक्रेता श्री. कदीर पटेल तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी त्यांचे पालक, म्हसावद व परिसरातील सर्व खेड्यातील नागरिकांनी हार्दिकअभिनंदन केले.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व शाळेची प्रगती करण्याचा मानस यावेळी नवनियुक्त प्राचार्य श्री. गणेश बच्छाव सर यांनी व्यक्त केला

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link