एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

नूतन ज्ञान मंदिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अडावद येथील काळभैरव मंदिर परिसरात राबवले स्वच्छता अभियान

नूतन ज्ञान मंदिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अडावद येथील काळभैरव मंदिर परिसरात राबवले स्वच्छता अभियान

जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील

अडावद ता चोपडा येथील नूतन ज्ञान मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पी डी चौधरी सर (सिनि.) यांच्या मार्गदर्शनाखाली अडावद येथील चोपडा रोडवरील काळभैरव मंदिर परिसरात आज दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी स्वच्छता अभियान राबवले. नुकतेच मागील आठवड्यात या परिसरात काळभैरव यात्रा उत्सव संपन्न झालेला होता. यात्रोत्सवानिमित्ताने या परिसरात अनेक खाद्य विक्रेते, नारळ विक्रेते, विविध वस्तूंचे विक्रेते आपली दुकाने लावत असतात. यात्रोत्सवानिमित्ताने परिसरातील नागरिकांची गर्दी या ठिकाणी उसळलेली असते. यात्रोत्सवानंतर या परिसरात कागद, कॅरीबॅग, कचरा पसरलेला असतो. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचे महत्व रुजावे, पर्यावरणाचा समतोल राखला जाऊन सामाजिक कार्य विद्यार्थ्यांकडून घडावे या उद्देशाने विद्यालयातील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी या स्वच्छता अभियानात भाग घेतला. विद्यार्थ्यांसमवेत स्वतः मुख्याध्यापक श्री पी डी चौधरी सर, शिक्षक प्रतिनिधी श्री बी पी महाजन सर, श्री आर व्ही महाजन सर, श्री ए एस बिऱ्हाडे सर यांनी देखील सहभाग घेतला. या सामाजिक उपक्रमाबद्दल इको क्लब चे सदस्य, सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या उपक्रमाला सर्वांचे सहकार्य लाभले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link