एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

युवा व्हिजनसह राजकीय वाटचाल ; स्वप्निल सोनवणे यांनी घेतले सुरेशदादा जैन यांचे आशीर्वाद

युवा व्हिजनसह राजकीय वाटचाल ; स्वप्निल
सोनवणे यांनी घेतले सुरेशदादा जैन यांचे आशीर्वाद !

समाधान पाटील जळगाव जिल्हा प्रतिनिधी

जळगाव : स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा नेतृत्वाला चालना मिळत असताना, जळगाव तालुक्यातील स्वप्निल सोनवणे यांनी जळगाव जिल्ह्याचे राजकीय पितामह, माजी मंत्री आणि वरिष्ठ नेते सुरेशदादा जैन यांची वाढदिवसानिमित्त भेट घेत त्यांच्या मार्गदर्शनाचा व आशीर्वादाचा लाभ घेतला. या भेटीदरम्यान सुरेशदादा यांनी स्वप्निल यांच्याशी थोडक्यात चर्चा करत पाठीवर आशिर्वादाची थाप ठेवली.
निवडणूक जवळ येत असताना या भेटीमुळे स्वप्निल यांच्या उमेदवारीला युवा आणि वरिष्ठ दोन्ही पातळीवर सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. कानळदा भोकर गटातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित काम करण्याची तयारी त्यांनी व्यक्त केली. स्वप्निल सोनवणे हे व्यावसायिक सिव्हिल इंजिनिअर असून त्यांनी आपल्या तांत्रिक ज्ञानाचा वापर करून तालुका तथा जिल्हा स्तरावर नियोजित पायाभूत सुविधा विकास, गावनिहाय रस्ते बांधणी, स्वच्छता प्रकल्प, पाणीपुरवठा व्यवस्थेचे आधुनिकीकरण तसेच डिजिटल ग्रामसेवा यावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या भेटीवेळी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन चे संचालक शांताराम सोनवणे, कमलाकर पाटील, आबा कोळी आदिनसह मित्रपरिवार उपस्थित होता.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link