वसमत येथे महाविकास आघाडीची एकता बैठक संपन्न
हिंगोली श्रीहारी अंभोरे पाटील
हिंगोली जिल्हातील वसमत नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसमत येथे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीची महत्वपूर्ण बैठक संपन्न आज संपन्न झाली. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर साहेब व मित्र पक्षातील
काँग्रेस पक्षाचे नेते मा. हाफिज भाई, मा. मुनीर पटेल (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरद पवार गट), श्री. सुनील काळे (उपजिल्हा प्रमुख, शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), दौलत हुंबाड ( तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरद पवार गट) श्री. श्रीनिवास पोरजावर (माजी नगराध्यक्ष), काशिनाथ भोसले (शहरप्रमुख), अजगर पटेल, रियाज कुरेशी, डॉ. रेणुका पतंगे (महिला अध्यक्ष, शिवसेना), ॲड. अमनुल्हा खान (जिल्हा उपाध्यक्ष, काँग्रेस अल्पसंख्याक विभाग), शेख मोहसीन (राष्ट्रवादी शहर काँग्रेस अध्यक्ष), डॉ. पार्डीकर, रविकिरण वाघमारे, गणेश कमळु, तोहीद अफजल, अनिल कदम, मंगेश तनपुरे, सरफराज काजी तसेच महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.महाविकास आघाडीचा एकत्र बैठक संपन्न झाली समोरच्या पक्षातील फुटिरता लक्षात घेऊन महाविकास आघाडीने योग्य निर्णय घेऊन नियोजन बैठक संपन्न केली विरोधी पक्ष म्हणून महाराष्ट्रात एकत्र आसले नगरपालिका वसमत साठी निवडणूक एकजुटीने लढणार असल्याचे पाहायला मिळत आहे
एकजूट आणि समन्वयाच्या बळावर आगामी निवडणुकीत यश मिळवण्याचा दृढ संकल्प व्यक्त करण्यात आला आहे
महाविकासआघाडी वसमत साठी राष्ट्रवादीकाँग्रेस शिवसेना काँग्रेस स्थानिकस्वराज्यसंस्था एकत्र लढणार







