महा एनजीओ फेडरेशन यांच्या माध्यमातून दिवाळी फराळ वाटप
पुणे प्रतिनिधी कांताभाऊ राठोड
महा एनजीओ फेडरेशन यांच्यामार्फत अनाथ ,अपंग, निराधार,
असाह्य ,मुकबधीर लोकांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने दिवाळी फराळ किट वाटप करण्यात आले.
दि. 14 ऑक्टोंबर 2025 रोजी
महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष मा . शेखरजी मुदंडा सर यांच्या मार्गदर्शनाने व जेष्ठ संचालक मा.मुकुंद शिंदे सर यांच्या आदेशाने
श्री छत्रपती प्रतिष्ठान पुणे संचलित निवासी मतिमंद विद्यालय हिंगणे विठ्ठलवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांना
झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य
संस्थापक / अध्यक्ष मा.कांताभाऊ राठोड ,पुणे जिल्हा सचिव सौ. अनघलक्ष्मी दुर्गा मॅडम यांच्या हस्ते शाळेत जाऊन मिठाईचे दिवाळी फराळाचे बॉक्स वाटप करण्यात आले.
यावेळी शाळेतील शिक्षक स्टाफ व सेवक स्टाफ उपस्थित होते.









