युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पुरंदर तालुका उपाध्यक्षपदी मा. शामराव जगताप यांची निवड
पुणे प्रतिनिधी अनघलक्ष्मी दुर्गा
दिनांक १० ऑक्टोबर 2025 रोजी जेजुरीचे पत्रकार मा.शामराव जगताप यांची नियुक्ती युवा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष मा.गणेश कचकलवार सर यांच्या आदेशाने व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. गणेश महाडिक सर यांच्या हस्ते निवड पत्र देऊन निवड करण्यात आले.
यावेळी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील विविध पदाधिकारी यांची निवड करण्यात आली. विक्रम माळवतकर पुणे जिल्हा उपाध्यक्ष उत्तर विभाग , संदीप रोमन पुरंदर तालुका अध्यक्ष ,विजयकुमार हरिश्चंद्र जेजुरी शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आले .
ही निवड करण्यासाठी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा.संतोष लांडे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष मा.कांताभाऊ राठोड, पुणे जिल्हा अध्यक्ष मा.विशाल अडागळे ,पुणे जिल्हा महिला अध्यक्ष सौ.अनघलक्ष्मी दुर्गा पुणे उपाध्यक्ष मा.गोपाळ भालेराव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
युवा ग्रामीण पत्रकार संघ नेहमीच पत्रकारांच्या
समस्या, सुख दुखात व परिवाराच्या अडचणी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच तत्पर असते.
तसेच पीडित, गरजू लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांच्या बाजूने भक्कमपणे उभे राहते.
युवा ग्रामीण पत्रकार संघ नेहमी सक्षम आहे








