सोनेसांगवी गावचे सुपुत्र श्री अमोल सुशीला माणिकराव गुळवे यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन.. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलनी त्यांची राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली आहे.
प्रतिनिधी सारंग महाजन.
श्री अमोल गुळवे सर ब्राह्मण पाडा एज्युकेशन सोसायटी संचलित शांतीग्राम विद्यामंदिर प्राथमिक विभागामध्ये गेले 18 वर्षांपासून कार्यरत आहेत. श्री गुळवे सर यांनी तालुका स्तर, जिल्ह्या स्तरावर सुलभकाची भूमिका पार पडली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी शिक्षण अध्यापनात डिजिटल माध्यमांचा वापर करतात. विद्यार्थी स्पर्धा परीक्षा टिकावे यासाठी विशेष प्रयत्न करतात. विशेष बाब म्हणजे जापनीज भाषा शिकवण्यासाठी ते प्रयत्न करतात. अध्यापनात विविध कौशल्यांचा वापर करून वर्गात आनंददायी वातावरण ठेवतात.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शिक्षकांचे प्रयत्न असतात. श्री गुळवे सर यांनी ब्राह्मणपाडा एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापक डॉक्टर महेशजी गावडे साहेब यांचे विशेष आभार मानले. शांतिग्राम विद्या मंदिर प्राथमिक विभागात सेवा करण्याची संधी दिली त्यांनी त्यांची आभार मानले..
राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार निवड झाल्यामुळे विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुरस्कार निवडीमुळे विविध स्तरातून श्री गुळवे सर यांचे कौतुक केले जात आहे सत्कार समारंभाचा कार्यक्रम 12 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता..
काँग्रेस कमिटी प्रदेश कार्यालय काकासाहेब गाडगिळ मार्ग दादर पश्चिम येथे संपन्न होईल..
पुरस्कारासाठी निवड झाल्यामुळे त्यांचे जन्म ठिकाण सोनेसांगवी गावातील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गावातील सुपुत्राचे यश पाहून गावकऱ्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.









