वीर जिवाजी महाले यांच्या स्मारकाचे सुशोभिकरण करणार आमदार हेमंत रासने
पुणे प्रतिनिधी गणेश तारु
प्रतापगडावरच्या रणसंग्रामाच्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्राणांचे रक्षण करणाऱ्या शूरवीर जिवाची महाले यांचे कार्य हे प्रेरणादायी आहे. हा इतिहाससमाजापुढे “होता जिवा म्हणून वाचला शिवा ” या म्हणीतून अजरामर आला. त्यांच्या रास्ता पेठ येथील स्मारकाचे सुशोभिकरण आगामी वर्षभरात पूर्ण करताना त्याला निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे प्रतिपादन आ.हेमंत रासने यांनी केले ते बारा बलुतेदार विकास संघ,वीर जीवा महाले स्मारक समिती व सकल नाभिक समाज आयोजित त्यांच्या ३९० व्या जंयतीनिमित्त कार्यक्रमात त्यांच्या पूर्णकृती पुतळयास पुष्पहार अर्पण केल्यानंतर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बलुतेदार संघ प्रदेशाध्यक्ष रामदास सूर्यवंशी होते. यावेळी प्रमुख पाहुणे आ.बापूसाहेब पठारे, माजी महापौर प्रशांत जगताप,मा.नगरसेविका पल्लवी जावळे,रविंद्र ननावरे,गणेश वाळुंजकर, सुनील पवार, विनोद काळोखे, चेतन मोरे, अमित कंक, निलेश कदम गणेश नलावडे, भस्मराज तिकोने उपस्थित होते. प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक व्हावे तसेच रास्ता पेठेत त्यांचा ब्रॉन्झचा पूर्णकृती पुतळा उभारावा अशी मागणी सकल नाभिक समाजवतीने रामरास सूर्यवंशी यांनी केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र पंडित, हेमंत श्रीखंडे, उदय दैठणकर,चंद्रशेखर जावळे,गणेश वाळुंजकर,अजित आढाव,महेंद्र गायकवाड,सतीश पांडे,राजू आढाव,विनायक गायकवाड, रविंद्र राऊत,सारंग काशीद आदींनी प्रयत्न केले.
रामदास सूर्यवंशी राजेंद्र पंडित हेमंत श्रीखंडे गणेश वाळुंजकर









