पंतप्रधान धन ,धान्य, कृषी योजनेच्या शुभारंभास. प्रा.संदीप जायेभाय, कृषीभूषण भगवानभाई इंगोले यांची निवड
नांदेड. श्रीहारी अंभोरे पाटील

नांदेड ची नैसर्गिक योगिक हळद पोहोचणार पंतप्रधान च्या किचन पर्यंत धन्य , धान्य ,कृषी योजनेच्या शुभारंभ 11 नवंबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते होणार, शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेटून संवाद साधणार आहेत कार्यक्रमास कृषी विज्ञान केंद्र नांदेड च्या वतीने प्रा. संदीप जायेभाय (कृषीविद्या तज्ञ) व कृषी भूषण भगवानभाई इंगोले ( *मास्टर ट्रेनर* राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान) यांची निवड.पंतप्रधान धन , धान्य, एक सरकारी योजना आहे, ज्याला जुलै २०२५ मध्ये मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतीचे उत्पादन वाढवणे, पिकांमध्ये विविधता आणणे, सिंचन आणि धान्य साठवण सुविधा सुधारणे, तसेच शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणे हा आहे. ही योजना नीती आयोगाच्या आकांक्षी जिल्हा कार्यक्रमावर आधारित असून, पहिल्या टप्प्यात १०० जिल्ह्यांमध्ये सुरू केली जाईल.
योजनेची उद्दिष्टे:
उत्पादकता वाढवणे: शेतकऱ्यांच्या शेती उत्पादकतेत वाढ करणे.
पीक वैविध्य: शेतकऱ्यांना विविध प्रकारची पिके घेण्यास प्रोत्साहन देणे.
पायाभूत सुविधा सुधारणे: सिंचनाच्या सोयी वाढवणे आणि धान्य साठवणुकीसाठी ग्रामपंचायत व गट स्तरावर सुविधा निर्माण करणे.
कर्ज उपलब्धता: शेतकऱ्यांना कमी आणि दीर्घ मुदतीचे कर्ज सहज उपलब्ध करणे.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये:
कालावधी: ही योजना ६ वर्षांच्या कालावधीसाठी आहे.
अंमलबजावणी: ही योजना २०२५-२६ पासून सुरू होईल आणि नीती आयोगाच्या आकांक्षी जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करेल.
लक्ष: कृषी उत्पादकता वाढवणे, पिकांमध्ये विविधता आणणे, सिंचन सुधारणे आणि कर्जाची उपलब्धता वाढवणे यावर योजना भर देते. नैसर्गिक शेतीमुळे प्रकृती पर्यावरणाचे संवर्धन होते जमिनीची सुपीकता वाढते, रासायनिक खतं औषधामुळे आरोग्य बिघडत आहे आजार वाढत आहेत यासाठी विषमुक्त नैसर्गिक शेती करणे ही काळाची गरज आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न असेल, असे कृषिभूषण भगवान भाई इंगोले यांनी सागितले नांदेडची नैसर्गिक योगीक हळद पोचणार पंतप्रधानांच्या किचन पर्यंत .









