दिनदर्शिका विमोचन सोहळा : जनजाती कल्याण आश्रम पुणे महानगरात उत्साहात संपन्न
पुणे प्रतिनिधी अनघलक्ष्मी दुर्गा
पुणे, दि. ५ ऑक्टोबर २०२५ :
अखिल भारतीय जनजाती कल्याण आश्रम संलग्न पुणे महानगरतर्फे आयोजित *दिनदर्शिका २०२६ विमोचन कार्यक्रम* आज सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या *लेडी रमाबाई सभागृहात* उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी *मा. प्रल्हादजी राठी* होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून *पद्मश्री चैत्रामजी पवार* उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. पुणे महानगर अध्यक्ष *मा. प्रकाशजी धोका* यांनी शाल-श्रीफळ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. *सचिव श्री. सतीश मोकाशी* यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.
ज्येष्ठ कार्यकर्त्या *श्रीमती शोभा जोशी* यांनी यंदाच्या दिनदर्शिकेचे वैशिष्ट्य सांगितले. पारंपरिक माहितीसह यंदा दिनदर्शिकेत *पद्मश्री सन्मानित जनजाती कार्यकर्त्यांचा परिचय व रानभाज्यांवरील विशेष माहिती* समाविष्ट करण्यात आली आहे.
या प्रसंगी संस्थेचे ज्येष्ठ कार्यकर्ते व पुणे महानगर अध्यक्ष *मा. प्रकाशजी धोका* यांच्या पंचाहत्तरीनिमित्त विशेष अभिष्टचिंतन करण्यात आले. त्यांच्या सामाजिक योगदानावर आधारित एक माहितीपटही दाखवण्यात आला. सन १९७४ पासून त्यांनी औद्योगिक क्षेत्रासह समाजकार्यात मोलाचे योगदान दिले आहे.
*कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण* होते पद्मश्री चैत्रामजी पवार यांची प्रकट मुलाखत, जी *प्रा. सुधीरजी गाडे* (माजी सहसचिव, एम.ई.एस. सोसायटी) यांनी घेतली. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बारीपाडा गावचे रहिवासी असलेले चैत्रामजी पवार यांनी उभारलेले *वनव्यवस्थापन आणि ग्रामविकास मॉडेल* देशभरात आदर्श ठरले आहे.
त्यांच्या कार्यात *जंगल, जल, पशुधन, जनधन व स्थानिक संसाधन* हे पाच मुख्य स्तंभ मानले गेले आहेत. वृक्षलागवड, जलसंधारण, दुबार शेती उत्पादन, रानभाज्यांचा प्रसार, महिलांच्या स्वयंपूर्णतेसाठी प्रयत्न, ग्रामविकासातील बचत गटांचे पुनर्रचना अशा विविध क्षेत्रांत त्यांनी नवे प्रयोग केले आहेत. *”सोच बदलो, बाकी सब बदल जायेगा”* हे कल्याण आश्रमाचे वाक्य त्यांच्या कार्यात प्रेरणादायी ठरले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर ७८ देशांच्या सर्वेक्षणात बारीपाडा गावाला *दुसरा क्रमांक*, तर *IFDA पुरस्कार* मिळाला आहे. महाराष्ट्र व भारतभरातील अनेक सन्मानांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
मुलाखतीत त्यांनी सांगितले की –
*”विकास म्हणजे शुद्ध अन्न, शुद्ध हवा आणि शांत झोप. ग्रामविकास व शाश्वत प्रगतीसाठी ग्रामीण व शहरी विभागांचे परस्पर जोडणे अत्यावश्यक आहे.
त्यांनी स्थापन केलेल्या *शबरी नॅचरल ग्रामउद्योगा*तून पर्यावरणपूरक पदार्थांचा प्रसार होत असून, गिरीशजी कुबेर यांच्या सहकार्याने *वनांचल विज्ञान केंद्रांना शासनमान्यता* मिळवण्यात त्यांनी यश मिळवले आहे.
कार्यक्रमाच्या अखेरीस *श्री. प्रकाशजी खिचडे* यांनी नाशिक जिल्ह्यातील गुही गावातील शाळा प्रकल्पासाठी मदतीचे आवाहन केले. *श्रीमती तुषारिका लिमये* यांनी आभारप्रदर्शन केले.








