कात्रजच्या दुग्ध व दुग्धजन्य पदार्थांच्या अद्यावत पार्लरचे शुभारंभ.
प्रतिनिधी -सारंग महाजन.
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज दूध संघ) युवा चेअरमन स्वप्निल जी यांच्या संकल्पनेतून पुणे कॅम्प कमांड हॉस्पिटल येथे मिल्ट्री युनिटच्या मागणीनुसार कात्रजच्या दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या अद्यावत पार्लरचा शुभारंभ करण्यात आला.
मेजर जनरल श्री बी. नंबी आर (AVSM,SM , VSM, Commandant CHSC, PUNE) यांच्या शुभ हस्ते पार्लरचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी त्यांच्यासह ब्रिगेडियर संगीता खन्ना, ब्रिगेडियर एच. एन. कुलकर्णी, ब्रिगेडियर अमिषा एम पोटर्स, कर्नल ईश्वर दास, कर्नल कुलरीन यांचे स्वागत कात्रज दूध डेअरीचे युवा चेअरमन स्वप्निल जी यांनी केले.









