दुःखद: मुलाची आत्महत्या 12 तासात बापानेही सोडले प्राण बाप-लेकाच्या निधनाने नांदेड हादरले…
प्रियांका देशमुख नांदेड जिल्हा प्रतिनिधी
नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावात बाप-लेकाने अवघ्या 12 तासाच्या अंतराने आत्महत्या केली आहे. याबाबत बाप-लेकाच्या आत्महत्येने नांदेड जिल्हा हादरला आहे. अतिवृष्टीमुळे बेजार झालेल्या शेतकऱ्याने आयुष्याचा दोर कापण्याचा निर्णय घेतला. नांदेड मध्ये मुलगा गेल्याचे समजताच अवघ्या 12 तासात बापानेही प्राण सोडला आहे. माझे सर्व पीक पाण्याखाली गेले होते. माझ्या मुलाला रोजगार नाही आमच्या आरक्षणाच्या नोंदी सापडत नाहीत असे नांदेड मधील शेतकऱ्यांनी आयुष्याचा दोर कापला त्याच्या आदीं मुलानेही जीव दिला आहे. बाप-लेकाच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पूर परिस्थिती व आरक्षण नसल्याचा चिठ्ठीत उल्लेख आहे. कोंढा गावातील शेतकरी निवृत्ती कदम यांनी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली अतिदृष्टीमुळे मुलाच्या आत्महत्येने वडिलांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनीही अवघ्या 12 तासात आपले प्राण सोडले आहेत. पीक पाण्याखाली गेलं मुलाला नोकरी नाही आरक्षणाच्या नोंदणी सापडत नाहीत असा चिठ्ठीत उल्लेख करीत कदम यांनी आपल्या आयुष्य संपवले आहे पोलिसांनी चिठ्ठी जप्त आहे. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यांतील कोंढा गावातील निवृत्ती कदम आणि सखाराम कदम असं पिता पुत्राचे नाव आहे. नांदेड जिल्ह्यात मागील आठवड्यापासून ढगफुटी सारखा मुसळधार पाऊस पडत असल्याने शेतातील उभीरी पिके पूर्णपणे बरबाद झाली आहेत. या नुकसानीमुळे शेतकरी सखाराम कदम (वय 60 ) आणि त्यांचा मुलगा निवृत्ती कदम (वय 35) यांच्यावर प्रचंड मानसिक दबाव ताण आला होता. सोमवारी रात्री निवृत्ती कदम यांनी शेतातील एका झाडाला गळफास घेवुन आत्महत्या केली. आणि मुलाच्या आत्महत्याची माहिती समजताच बापानेही अवघ्या 12 तासात प्राण सोडलं आहेत. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद अर्धापूर पोलीस ठाण्यात झाली आहे.







