चार तडीपार आरोपींना अग्निशस्त्र व जिवंत काडतुसांसह केली अटक.
खंडणी विरोधी पथक. २ गुन्हे शाखा. पुणे यांची दमदार कामगिरी.
पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भालेराव
पुणे :आज दिनांक 02 आक्टोबर 2025 रोजी खंडणी विरोधी पथक ०२ गुन्हे शाखा, पुणे शहरचे पोलीस उप-निरीक्षक गौरव देव यांना गुप्त माहीती मिळाली की, तडीपार असलेला आरोपी हा त्याच्या मित्रासोबत पांढ-या रंगाच्या मर्रसडिज कार मधुन फुरंसुगी पोलीस स्टेशन हद्दीत फिरत आहे. बातमीच्या अनुषंगाने पोलीस उप-निरीक्षक गौरव देव यांनी खात्री करुन सदरची बातमी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, युनिट-६, गुन्हे शाखा व अतिरीक्त कार्यभार खंडणी विरोधी पथक ०२ गुन्हे शाखा पुणे शहर यांना वरील बातमीचा आशय सांगितला असता त्यांनी सदर ठिकाणी जावुन सापळा लावुन बातमीप्रमाणे खात्री करुन योग्यती कारवाई करण्या बाबत सुचना दिल्याने पोलीस उप निरीक्षक गौरव देव व खंडणी विरोधी पथक ०२ कडील पोलीस अंमलदार यांनी मंतरवाडी फाटा येथे थांबुन रात्रौ ०१:१० वा. च्या सुमारास सापळा रचुन इसम नाव १) अमर हनुमंत गाडे, वय २९ वर्षे, रा. थिटे वस्ती, समर्थ हॉस्पीटल शेजारी खराडी पुणे २) गोपाळ संजय यादव, वय २६ वर्षे, रा. कामठीपुरा, ता. शिरुर जि. पुणे, ३) सनी संजय यादव, वय २७ वर्षे, रा. कामठीपुरा, ता. शिरुर जि. पुणे व ४) निशांत भगवान भगत, वय २७ वर्षे, रा. बेकराईनगर पापडे वस्ती, संजोदा कॉम्पलेक्स शेजारी, फुरसुंगी पुणे यांना ताब्यात घेण्यात आले. या वेळी आरोपी नाव अमर हनुमंत गाडे याच्या कमरेला ०१ गावठी बनावटीचे पिस्टल व ०३ जिवंत काडतुस मिळुन आले. आरोपी नाव अमर हनुमंत गाडे याच्या kadune जप्त करण्यात आलेल्या गावठी बनावटीच्या पिस्टलबाबत अधिक चौकशी केली असता त्यांने सांगीतले की, सदर पिस्टल हे त्याने स्वतःचे स्वसंरक्षणासाठी त्याचे मित्र गोपाळ संजय यादव व निशांत भगवान भगत यांच्या सोबत दिनांक ११/०५/२०२५ रोजी सेंदवा राज्य मध्यप्रदेश येथे जावुन विकत घेतले असुन पिस्टल खरेदी करण्यासाठी रोख पैसे सनी संजय यादव याने दिल्याचे सांगितले आहे. सदरचे चारही आरोपी यांच्या वर पुणे शहर व इतर ठिकाणी वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. सदर बाबत फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३३३/२०२५ आर्म अॅक्ट क. ३(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२, ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यामध्ये एक अग्निशस्त्र, ०३जिवंत काडतुसे व एक मर्रसडिज कंपनीची CLA 200 CDI मॅडेल ची कार असा एकुण १०,४१,५००/- रु.किं. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-२ पुणे शहर श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शानाखाली खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक श्री. वाहिद पठाण यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उप निरीक्षक गौरव देव, पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, अनिल कुसाळकर, सचिन रणदिवे, किरण पडयाळ, चेतन आपटे, दिलीप गोरे, अमोल राऊत, प्रशांत शिंदे, गणेश खरात व पवन भोसले यांनी केली आहे.







