अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पुणे प्रतिनिधी शंकर जोग
गुरु तेग बहादूर साहिबजींच्या 350 व्या शहीदी शताब्दी यात्रेचे भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने भव्य स्वागत संपन्न,
गुरु तेग बहादूर साहिबजींच्या 350 व्या शहीद शताब्दी यात्रेचे स्वागत भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जसप्रीत सिंग सलूजा यांच्या हस्ते पुण्यात स्वागत मोठ्या उत्साहात पार पडले, संपूर्ण पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्रभरातून आलेले शीख समाजाचे मान्यवर व भाविक नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते, या यात्रेच्या स्वागतासाठी पुष्पवर्षाव करण्यात आला तसेच फुलांच्या पायघड्या आकर्षण आरास जमिनीवर सजवण्यात आली होती, गुरु महाराज यांची यात्रेच्या या पालखीला सर्व धर्म समभाव समाज बांधव यांनी पुष्पवर्षाव केला, यावेळी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जसप्रीत सिंग सलुजा यांनी सांगितले गुरु तेग बहादुर साहिबजींच्या 350 व्या शहिदी शताब्दी यात्रेचे आसाम येथून सुरू झाली संपूर्ण भारतात ही यात्रा फिरणार आहे पुण्यामध्ये आकुर्डी गुरुद्वार, गणेश पेठ गुरुद्वार आणि कॅम्प गुरुद्वारा मध्ये एक दिवस मुक्कामी असणार आहे, धर्म व संस्कृतीची जपवणूक करण्याचे भाग्य लाभले, त्यामुळे आम्ही धन्य झालो, यात्रेचे उद्दिष्ट म्हणजे गुरु तेग बहादूर साहिबजींचा गौरवशाली इतिहास, त्यांचा त्याग आणि संदेश समाजापर्यंत पोहोचवणे यासाठी विविध ठिकाणी भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे, असे जसप्रीत सिंग सलुजा यांनी सांगितले,








