प्रशासनाने सील ठोकताच व्यापार्यांनी बंद पाडली प्रदर्शनी
हिंगोली प्रतिनिधी श्रीकांत शिंदे सह श्रीहरी अंभोरे पाटील हिंगोली
हिंगोलीतील श्री सार्वजनिक दसरा महोत्सवातील प्रकार
हिंगोली शहरातील दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दसरा महोत्सव सुरू होता पन पावसामुळे झालेल्या नुकसानीचे निमित्त करून प्रदर्शनीतील झुले व इतर खेळांच्या कंत्राटदाराने ठरलेली रक्कम न भरल्यामुळे प्रशासनाने बुधवारी सायंकाळी सील ठोकले होते. या विरोधात कंत्राटदार व प्रदर्शनीतील व्यापार्यांनी काहीकाळ प्रदर्शनी बंद पाडली होती. रात्री उशीरा काही रक्कम भरल्यामुळे प्रदर्शनी पुर्ववत सुरु करण्यात आली.
काही रक्कम भरल्याने सायंकाळी उशीरा प्रदर्शनी पूर्ववत
हिंगोली शहरातील श्री सार्वजनिक दसरा महोत्सव हा सर्वदूर प्रसिध्द आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यातील अनेक व्यवसायीक दसरा महोत्सवाच्या औद्योगिक प्रदर्शनीमध्ये सहभागी होत असतात. या महोत्सव निमित्त ६ सप्टेंबरला बासा पुजन करण्यात आले होते. त्यानंतर २२ सप्टेंबर रोजी कृषि औद्योगिक प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनीत बच्चे कंपनीसह अनेकांना आनंद लुटण्याकरीता वेगवेगळ्या प्रकारचे झुले, आकाश पाळणा, हातोडा व इतर खेळणे उपलब्ध झाले.
यासाठी कंत्राटदाराने जवळपास १ कोटी रुपये रक्कम भरण्या करीता लिलाव पध्दतीने या बाबी हाताळल्या. तसेच अनेक गाळे धारकांनी देखील हजारो रूपये गाळ्यांसाठी प्रशासनाकडे दिले. दसरा महोत्सवानिमित्त थाटण्यात आलेल्या प्रदर्शनीमध्ये दरवर्षी आकाश पाळणा, चक्री यासहीत अनेक खेळाचे प्रकार एकाच कंत्राटदारातर्पेâ लावले जात असतात. यंदा ही हे सर्व प्रकार प्रदर्शनीत लावण्यात आले आहेत. यासाठी ठरलेल्या रक्कमेतून दरदिवशी ठराविक रक्कम भरण्याची मुभा कंत्राटदाराला देण्यात आली आहे.
२७ सप्टेंबरपर्यंत ३० लाख रुपये भरून या कंत्राटदाराने ७० लाख रुपये बाकी ठेवले. याबाबत सुचना देवुन ही कंत्राटदार पैसे भरत नसल्याने प्रशासनाने बुधवारी सायंकाळी या सर्व खेळ प्रकारांना सील ठोकल्याची माहिती तहसीलदार तथा समितीचे सचीव श्रीकांत भुजबळ यांनी दिली. प्रशासनाच्या या कारवाईच्या निषेधार्थ कंत्राटदारांने प्रदर्शनी बंद पाडली. सायंकाळी उशीरापर्यंत याबाबत तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान दसर्याचा आनंद घेण्यासाठी ग्रामीण भागातून आलेल्या भाविकांना मात्र याचा फटका बसला.
एकीकडे मध्यंतरी अतिवृष्टी झाल्याने रामलीला मैदानावर संपूर्ण चिखल झाला होता. प्रशासनाने चुरी टाकुन मैदानाची व्यवस्था पूर्ण केली. कशी बशी दोन दिवसापासून प्रदर्शनीत नागरीकांची रेलचेल दिसून येत असताना बुधवारी प्रदर्शनी बंद-प्रदर्शनी सुरुचे नाटक झाले. तुर्त या व्यापार्यांनी काही रक्कम भरली असून महोत्सवाचा खोळंबा होऊ नये म्हणून प्रदर्शनी परत सुरु करण्यात आली.







