तुफान’ एक नशा या सिनेमाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते ट्रेलर लॉन्च शुक्रवारी
प्रतिनिधी सतीश कडू
नागपूर – युवा हे उद्याच्या सक्षम भारताचे चिरायू भविष्य. तर जनता ही देशाची संपत्ती. मात्र आजचा युवा व ही अनमोल संपत्ती नशेच्या आहारी गेलेली आहे. सिगरेट, गुटखा, दारू, ड्रग अशा अनेक सेवनाने युवा पिढीला बाहेर काढण्यासाठी प्रबोधनाची अत्यंत आवश्यकता आहे. याच संवेदनशील अशा वेगळ्या विषयावर आधारित ‘तुफान’ एक नशा हा सिनेमा रिलीज होणे म्हणजे काळाची गरज आहे. मानव चेतना जनविकास बहुद्देशीय संस्था, नागपूर चे संस्थापक-अध्यक्ष धनराज विठ्ठलराव हरडे यांनी तुफान एक नशा या सिनेमाची निर्मिती केलेली आहे. या सिनेमाचे ट्रेलर लॉन्च शुक्रवारी ३ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ७ वाजता. केंद्रीयमंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या शुभहस्ते होणार असून त्यांच्या जनसंपर्क कार्यालयातील दुसऱ्या माळ्यावर छोटेखाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला ‘तुफान एक नशा’ या सिनेमाचे निर्देशक प्रेम धीराल, तसेच विशेष सहयोग लाभलेले श्याम थोरात यांच्यासह सिनेमात अभिनय करणाऱ्या सर्व वैदर्भीय कलावंतांची उपस्थिती असणार आहे.








