एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

20 ऑक्टोबरपर्यंत जिल्हास्तरीय प्रकरणांचा निपटारा करा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

20 ऑक्टोबरपर्यंत जिल्हास्तरीय प्रकरणांचा निपटारा करा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

जिल्हा प्रशासनास कठोर निर्देश;

प्रतिनिधी सतीश कडू

भंडारा / नागपूर दि. 30 : भंडारा जिल्ह्यातील जनता दरबारात प्राप्त झालेली जिल्हास्तरीय प्रकरणे 20 ऑक्टोबरपर्यंत जलद गतीने निकाली काढावीत असे स्पष्ट निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे राज्यमंत्री (गृह-ग्रामीण, गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म) डॉ. पंकज भोयर यांनी आज दिले.

ही बैठक पालकमंत्री डॉ. भोयर यांनी नागपूर येथील म्हाडा कार्यालयातून ऑनलाइन पद्धतीने घेतली. तर भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहातून जिल्हाधिकारी सावन कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक नुरूल हसून, अपर जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी लिना फलके यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

बैठकी दरम्यान जिल्ह्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. अतिवृष्टीमुळे मागील 9 महिन्यांत 130 जणांचा अपघाती मृत्यू झाल्याची बाब मांडली गेली असून त्यासंबंधीची माहिती प्रशासनाने सादर करावी, असे निर्देश देण्यात आले. पुरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे आदेशही जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी संबंधित विभागांना दिले.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला प्राधान्य देऊन गती द्यावी तसेच पाणंद रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सेवा पंधरवाड्यात शासन निर्णयानुसार प्रगतीपथावर आहेत, अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
तालुका निहाय जनता दरबाराची माहिती पुढील प्रमाणे आहे.

तालुका जिल्हयात एकुण प्राप्त
प्राप्त निकाली प्रलंबित
तुमसर 60 35 37
लाखनी 51 12 39
साकोली 50 20 30
मोहाडी 65 21 44
पवनी 83 47 36
भंडारा 151 39 112
लाखांदुर 62 21 41
एकूण 522 195 339

जनता दरबारात येणाऱ्या तक्रारी मधील काही प्रकरण ही नाही प्रविष्ट देखील असतात न्यायप्रविष्ट प्रकरणाबाबत संपूर्ण अध्यायवत माहिती घेऊन ती पालकमंत्री कार्यालय सादर करावी. शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या विषयांची संपूर्ण संदर्भीय माहिती व त्यासंबंधित केलेल्या कार्यवाहीचा अहवाल याची एक पालकमंत्री कार्यालय देण्याचे निर्देशही श्री.भोयर यांनी दिले .

“जनता दरबारातील तक्रारी तातडीने निकाली काढून नागरिकांना दिलासा देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. जिल्हा स्तरावरील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा निश्चित कालमर्यादेत करावा आणि लोकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता वेळेत व्हावी यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी जबाबदारीने काम करावे,” असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.

 

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link