एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलिस मित्र समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. श्री महेश सारणीकर यांच्या विदर्भ दौऱ्यात गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यातील आढावा बैठक उत्साहात पार पडली

माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलिस मित्र समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. श्री महेश सारणीकर यांच्या विदर्भ दौऱ्यात गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यातील आढावा बैठक उत्साहात पार पडली

उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा अध्यक्ष मनोज उराडे यांचा सत्कार

अजय पाटील यांची चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी पदोन्नती

गडचिरोली प्रतिनिधी सुरज गुडमवार

माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलिस मित्र समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. श्री महेश सरणीकर यांच्या विदर्भ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली येथे गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यांची संयुक्त आढावा बैठक भव्यदिव्य वातावरणात पार पडली. बैठकीस गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांतील पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगमनानंतर राज्याध्यक्षांचा पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ देऊन मान्यवरांनी मनःपूर्वक सत्कार केला. सभागृहात टाळ्यांच्या गजरात झालेल्या या स्वागत सोहळ्याने उपस्थितांना एकात्मतेची नवी ऊर्जा दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वतः मा. श्री महेश सारणीकर सर होते. प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ संघटक सौ. ज्योत्स्ना करवाडे तसेच गडचिरोली जिल्हा अध्यक्ष मा. श्री मनोज उराडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष मा. श्री अजय पाटील यांनी नेत्रदीपक पद्धतीने केले. आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनामध्ये राज्याध्यक्ष श्री सारणीकर यांनी माहिती अधिकार, पत्रकार संरक्षण आणि पोलिस मित्र समितीची समाजातील भूमिका या त्रिसूत्रीवर सखोल विवेचन केले. त्यांनी स्पष्ट केले की समितीचे मूळ उद्दिष्ट न्याय, पारदर्शकता व उत्तरदायित्व समाजात दृढपणे प्रस्थापित करणे हे आहे. आजच्या बदलत्या सामाजिक-प्रशासकीय वातावरणात प्रत्येक तालुक्यात सक्षम नेतृत्व घडवून सशक्त संघटना उभारणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या ओजस्वी मार्गदर्शनाने संपूर्ण सभागृहात उत्साह आणि प्रेरणा संचारली.

या बैठकीदरम्यान उत्कृष्ट कार्याबद्दल गडचिरोली जिल्हा अध्यक्ष श्री. मनोज उराडे यांचा शाल-श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष श्री अजय पाटील यांची पदोन्नती करून त्यांना चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले. याशिवाय समाजहितासाठी कार्यरत असलेल्या अनेक मान्यवरांचा प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. गौरवण्यात आलेल्यांमध्ये – श्री रोशन कवाडकर – जिल्हा सचिव, श्री सुरज गुंडमवार – जिल्हा उपाध्यक्ष, गडचिरोली, श्री कमलेश बोरूले – शहर अध्यक्ष, सौ. अनुपमा रॉय – तालुका महिला अध्यक्षा, चार्मोशी, सौ. गोपिका धुर्वे – तालुका महिला कार्यकारिणी सदस्या, चार्मोशी
आदींचा समावेश होता.

या आढावा बैठकीत गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, तालुका प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मा. श्री अजय पाटील यांनी केले. त्यानंतर एकात्मतेच्या आणि ज्वलंत उत्साहाच्या वातावरणात बैठकीची सांगता करण्यात आली.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link