अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
राजीव नगरात स्वच्छता, आरोग्य शिबिर व ज्येष्ठांचा सत्कार
प्रतिनिधी सतीश कडू नागपूर
नागपूर : राजीव नगर वर्धा रोड येथे मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबवून या भागाची व ग्राउंडची स्वच्छता करण्यात आली. तसेच आरोग्य शिबिर घेऊन येथील नागरिकांना स्वास्थ्य बद्दल सेवा देण्यात आले. राधाकृष्ण हॉस्पिटल व महात्मे हॉस्पिटल च्यावतीने आरोग्य कॅम्प घेण्यात आला याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याचप्रमाणे सरकारी सेवा देणारे पथक त्यामध्ये ठेवून लोकांना सहकारी सेवा देण्यात आली. असा हा वेगवेगळा कार्यक्रम किशोर चन्ने यांच्या वाढदिवसा निमित्ताने मित्रपरिवारांनी आयोजित केला हा कार्यक्रम दरवर्षी घेण्यात येतो. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रा. अनिलजी सोले, प्रा.चंद्रकांत रागीट, गौरीशंकर पाराशर, विवेक जी तरासे, ईश्वर डेंगरे, रितेश गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी घेण्यात आलेल्या उत्तम कार्यक्रमाला मान्यवरांनी आपल्या भाषणात स्तुती केली असे कार्यक्रम वेगवेगळ्या पद्धतीने घेऊन समाजसेवा करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. यावेळी जेष्ठांचा सत्कार करण्यात आला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित असलेले डॉ. विलासजी डांगरे अध्यक्षपदी होते त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्याच प्रमाणे मा. अनिलजी दांडेकर, प्रा. विजय यंगलवार, सुमन परतेकी, रितेश गावंडे, ईश्वर डेंगरे, नितीन महाजन, चंद्रकांत जी रागीट, समर्थ रागीट, योगा टीचर नूतन पलांदुरकर, संजय चन्ने, नेहाल नवखरे, निखिल भुते व उपस्थित डॉक्टर यांचा सत्कार करण्यात आला. शिबिराचा अनेकांनी नागरिकांनी लाभ घेतला. विवेक तरासे यांनी कार्यक्रमात तुळशीचे रोप वाटल्याबद्दल तरुण भारत च्यावतीने अभिनंदन केले. या कार्यक्रमामुळे आयोजक किशोर चन्ने यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. किशोरजीचन्ने या भागाचे समाजसेवक असून भाजपा ओबीसी मोर्चा त्रिमूर्ती नगर चे अध्यक्ष आहे तसेच संताजी समता परिषद महाराष्ट्र चे सरचिटणीस आहेत. याप्रसंगी बरेच नागरिक महिला मंडळ व मित्रमंडळ उपस्थित होते.










