एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पुणे पर्वती पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुस्क्या

पुणे पर्वती पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुस्क्या

पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर

पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भालेराव

पायी चालणा-या महिलेचे गळयातील मंगळसुत्र हिसकाऊन घेवुन चोरी करणा-या दोन आरोपीस शिताफीने पकडुन केले जेरबंद

दि.१५/०८/२०२५ रोजी मानसी अपार्टमेंट, तुळशीबागवाले कॉलनी, ढोमकरपथ सहकारनगर नं. ०२ लक्ष्मीनगर पर्वती पुणे येथे मोपेड गोटार सायकल वरील अज्ञात दोन इसमांनी फिर्यादी यांचे गळयातील सोन्याचे मंगळसुत्र बळजबरीने हिसकावुन घेवुन चोरी केले म्हणुन फिर्यादी यांनी अज्ञात अनोळखी इसमा विरुध्द दिले तक्रारी वरुन पर्वती पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २६०/२०२५ मा.न्या. सं. कलम ३०९ (४), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

दाखल गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार गायकवाड व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांचे मार्गदर्शनाखाली पर्वती पोलीस स्टेशन चे तपास पथक प्रभारी पोलीस उप-निरीक्षक किरण पवार हे करत असताना पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, राकेश सुर्वे, अमित चिव्हे, यांना त्यांचे खास बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहिती वरून सदरचा गुन्हा हा १) रोहन प्रभू तुपारे, वय २० वर्षे, रा. सर्व्हे ६४८/७ त्रिमुर्ती नगर, म्हसोबा मंदिर शेजारी नविन पदमवाती नगर, अप्पर बिबवेवाडी पुणे. व २) केशव ईश्वर कुंभार वय १८ वर्षे रा. खोपडे नगर चक्की कारखाना, महांगडेवाडी पुणे यांनी केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना शिताफिने पकडुन त्याचे ताब्यातुन ५ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड व एक मोटार सायकल असा १,११,०००/- रु. किं. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी ही मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा.पोलीस उप-आयुक्त परि-०३, पुणे शहर श्री. संभाजी कदम, मा. सहा. पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग पुणे श्री. अजय परमार, गांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांचे सुचनाप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक किरण पवार, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, राकेश सुर्वे, अमित विव्हे, महेश मंडलिक, सुर्या जाधव, श्रीकांत शिंदे, अमोल दबडे, नानासो खाडे, मनोज बनसोड, सद्दाम शेख, यांनी केली.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link