अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
चाकुचा धाक दाखवुन मोटार सायकल शोरुममध्ये जबरी चोरी करणा-या इसमास केले जेरबंद
पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भालेराव
पुणे:लाख दि. १९/०८/२०२५ रोजी खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एपी सेंटर ६४/सी, शोरुम नं. ०१ ब्रम्हा मोटर्स रॉयल एनफिल्ड (बुलेट) शोरुम वाकडेवाडी शिवाजीनगर पुणे येथे अज्ञात इसमाने वॉचमेनच्या गळयाला चाकु लावुन जिवे मारण्याची धमकी देवून काऊन्टर टेबलचे ड्रावर उघडुन त्यात ठेवलेली ११ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेवून पळून गेला. त्याअनुषांगने खडकी पोलीस ठाण्यात गु.र.न. २५२/२०२५ बी. एन.एस. ३०९ (४), अन्वये गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास करुन गुन्हा उघडकीस सुचना दिल्या होत्या.
वरिष्ठांच्या आदेशान्वये युनिट ४ चे पथक सदर भागात तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तसेच गोपणीय बातमीदारां मार्फतीने अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना, सहा. पोलीस निरीक्षक, अमर कदम, पोलीस उपनिरीक्षक, वैभव मगदुम, सहा. पोलीस फौजदार, हरीष मोरे, पोलीस हवालदार अमजद शेख, तुषार खराडे, किशोर दुशिंग, सुभाष आव्हाड, जहांगीर पठाण वांचे टिमला गोपणीय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, आठ दिवसापुर्वी वाकडेवाडी येथिल बुलेट शोरुममध्ये प्रतिक सावंत याने चोरी केलेली असुन तो सदरचे बुलेटचे शोरुममध्ये कामाला असून तो प्लॉट नं. ५२, महर्षीनगर येथे रहावयास आहे.” यूनिट-४ कडील पथकास मिळालेल्या बातमी प्रमाणे तात्काळ कारवाई करणेबाबत युनिट-४ वे पथकाने वाकडेवाडी वैथिल बुलेट शोरुम येथुन प्रतिक सावंत याचा फोटो प्राप्त करुन महर्षीनगर गुलटेकडी भागात प्लॉट नं. ५२ येथे सदर आरोपीचा शोध घेत असताना प्लॉट नं. ५२ येथे गणपती मंदीराजवळ एका दुचाकी मोटार सायकलवर बसलेला फोटोतील इसम दिसल्याने त्यास युनिट चे पथकाने घेराव घालुन ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव ऋतिक भारत सावंत वय २३ वर्षे, रा. प्लॉट नं. ५२, सुळे पीजी महर्षीनगर, गुलटेकडी, पुणे असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे दाखल गुन्ह्याबाबत तपास करता त्याने दाखल गुन्ह्याची कबुली दिल्याने आरोपींचा गुन्हयामध्ये सहभाग असल्याचे तपासामध्ये निष्पन झाल्याने. त्याचे ताब्यातील एक काळ्या रंगाची हिरो होंब सलेंडर मोटार सायकल MH-12-FV-0686 असे ५०,०००/-रु. कि. पंचनाम्याने जप्त करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री पंकज देशमुख, मा.पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री.निखिल पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-२ श्री. राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजय वाघमारे, युनिट ४ यांचे मार्गदर्शनात युनिट ४ कडील सहा. पोलीस निरीक्षक अमर कदम, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, सहा. पोलीस फौजदार हरीश मोरे, एकनाथ जोशी, पोलीस अंमलदार अमजद शेख, तुषार खराडे, किशोर दुशिंग, सुभाष आव्हाड, विठ्ठल वाव्हळ, प्रविण बालचिन, जहांगीर पठाण, वैभव







