अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
BUSS ( Blind Unity for Self Sufficiency) संस्थेतर्फे मैत्रीदीन साजरा
प्रतिनिधी लव क्षीरसागर मुंबई
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी Buss संस्थेच्या वतीने जागतिक मैत्रीदीन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जेष्ठ नागरिक मंडळ, घाटकोपर. येथे नीटनेटका शिस्तीत दिव्यांग मित्रांनी जेष्ठ नागरिकांना आनंद देण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्याच्यां उपस्थितीत मैत्रीदीन यशस्वीरित्या पार पडला.
अध्यक्ष राजू वाघमारे स्वतः अंध असल्यामुळे त्यांना बऱ्याच त्रासातून जावे लागले होते त्यामुळेच त्यांनी सुषमा सोनावणे , गणेश म्हामणकर , केदार कोष्टी यां त्यांच्या चार अंध मित्रांसोबत BUSS ( Blind Unity For Self Sufficiency) ही संस्था मोठया जिद्दीने स्थापन केली.
आज संस्था समाजातील सेवाभावी संस्था, व दानशूर लोकांना
एकत्र आणून सर्वांच्या सहकार्याने संस्था कार्यरत आहे.
संस्था खूप मोलाचे दिव्यांग सेवा, आरोग्य सेवा, शिक्षण, घरचे रेशनिंग किराणा इत्यादी स्वरूपात मोलाची मदत, सेवाकार्य करीत आहे.
BUSS संस्थेच्या कार्यकमात अशोक गजभिये यांनी ट्रस्टी म्हणून मोलाचा हातभार लावला आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातिला अध्यक्ष राजू वाघमारे यांनी मार्गदर्शनपर भाषण केले
व सर्वांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच या कार्यक्रमात जेष्ठ नागरिक पुरुष, व महिलांनी ही उखाणे, बैठक खेळ, गाणी, व नाच करून आनंद घेतला.
कार्यक्रमात छोटी गिफ्ट्स देऊन त्याचां सन्मान करण्यात आला.
जेष्ठ नागरीकांनी संपूर्ण कार्यक्रमा मध्ये नास्ताचीं उत्तम सोय केली होती. मैत्री दिनाच्या कार्यक्रमात गुरुनाथ वाघमारे, समृद्धी कापडोस्कर, सलोनी कांबळे , सजनी वाघमारे,अशोक गजभिये, ब्रह्मानंद आणि लव क्षीरसागर यांनी
मैत्री दिनाच्या निमित्ताने सर्वांनी एक दुसऱ्याला फ्रेंडशिप बँड, रिबीन हातात बांधल्या मैत्रीच्या गाण्यावर नाच केला.
शेवटी सर्वांनी आवडीने ग्रुप फोटो व्हिडीओ काढले.
Buss संस्थेने आपल्या मित्रांसोबत आमच्या जेष्ठ नागरिक मंडळाला भेट देऊन, सर्व जेष्ठ नागरिकांसोबत मनोरंजन कार्यक्रम करून आनंदित केल्याबद्दल आभारी आहोत असे जेष्ठ नागरिक मंडळ अध्यक्ष यांनी बोलून दाखविले.
शेवटी BUSS संस्था नियमानुसार
” खरा तो एकची धर्म,
जगाला प्रेम अर्पावे ”
यां प्रार्थनेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
प्रत्येकाने मैत्रीच्या कर्तव्य म्हणून
BUSS संस्थेचा
” मैत्री दीन २०२५” कार्यक्रम
यशस्वीरित्या सम्पन्न झाला.म्हणून
BUSS Team चे अध्यक्ष राजू वाघमारे यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद मानले.
मी Buss संस्थेचा सदस्य, आणि मित्र कायम आहे आणि त्यांच्या समाजकार्यात सेवा करण्यासाठी सदैव तयार असेन. आणि
मला या BUSS संस्थेचें सदस्य असल्याचा गर्व आहे असे लव क्षीरसागर कार्यक्रमात शेवटी बोलतांना म्हणाले.
