अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
नागपूर विभागातील १५८२ रुग्णांना
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १३.८१ कोटींची मदत
प्रतिनिधी सतीश कडू
मुंबई/नागपूर, दि. 12 : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष मोठा आधार बनला आहे. नागपूर विभागात मागील सात महिन्यांत तब्बल 1582 रुग्णांना 13 कोटी 81 लाख 20 हजार रुपयांची वैद्यकीय मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार पेपरलेस आणि डिजिटल प्रणाली, जिल्हा कक्षांची स्थापना करण्यात आली असल्याने रुग्णांना मंत्रालयात येण्याची गरज भासत नाही. रुग्णांनी प्रथम महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम किंवा धर्मादाय रुग्णालयांच्या योजनांचा लाभ घ्यावा. जर या योजनांद्वारे उपचार शक्य नसतील, तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकडे संलग्न असणाऱ्या रुग्णालयातून अर्ज करता येतो. यामुळे शासकीय योजनांचा वापर होतो आणि निधी खऱ्या गरजू रुग्णांपर्यंत पोहोचतो.
संपूर्ण राज्यात पेपरलेस प्रणाली, जिल्हा कक्षांची स्थापना आणि विविध सकारात्मक बदलांमुळे गरजू रुग्णांपर्यंत वेळेत मदत पोहोचत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार कक्षाचे कामकाज पारदर्शक पद्धतीने राबवले जात असून निधी खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचत आहे. यापुढेही जास्तीतजास्त गरजू रुग्णांना मदत केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी कळविले आहे.
*नागपूर विभागातील मदतीचा आढावा*
*(1 जानेवारी ते 31 जुलै 2025)*
जिल्हा रुग्णसंख्या मदत रक्कम
नागपूर 1396 12,16,82,000
वर्धा 41 39,55,000
भंडारा 31 29,35,000
गोंदिया 50 39,00,000
चंद्रपूर 54 47,48,000
गडचिरोली 9 9,00,000
*20 गंभीर आजारांसाठी मदत:*
• कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्षे 2 ते 6)
• हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो प्रत्यारोपण
• कर्करोग (शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन)
• रस्ते अपघात
• बालकांच्या शस्त्रक्रिया
• हिप व गुडघा रिप्लेसमेंट
• मेंदूचे आजार, डायालिसिस, अस्थिबंधन
• बर्न/विद्युत अपघातग्रस्त रुग्ण
• नवजात शिशुंचे आजार इ.
आवश्यक कागदपत्रे:
• रुग्णाचे आधार कार्ड व रेशन कार्ड
• रुग्ण दाखल असल्यास जिओ टॅग फोटो (अनिवार्य)
• तहसील उत्पन्नाचा दाखला (1.60 लाखांपेक्षा कमी)
• वैद्यकीय रिपोर्ट व खर्चाचे प्रमाणपत्र
• एफआयआर (अपघातग्रस्तांसाठी)
• झेडटीसीसी पावती (अवयव प्रत्यारोपणासाठी)
सर्व कागदपत्रे PDF स्वरूपात खालील ईमेलवर पाठवा:
aao.cmrf-mh@gov.in
अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक: 9321 103 103
