अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
ऑल इंडिया जमीयतुल कुरेश ने दिले आमदार देवराव भोंगळे यांना निवेदन !
संपादकीय
कुरेशी समाजाच्या पारंपरिक व्यवसायात येत असलेले अडथळे व अन्याय थांबविण्याची केली मागणी!
राजुरा(वि.प्र.):राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांची चंद्रपूर जिल्ह्यातील ऑल इंडिया जमीयतुल कुरेश ने कोठारी येथे भेट घेऊन कुरेशी समाजाला व्यापार क्षेत्रात येत असलेल्या समस्यांबाबत चे निवेदन दिले.
कुरेशी समाजाच्या पारंपरिक व्यवसायाबाबत कायदेशीर अडथळे व अन्याय थांबविण्यासाठी शासनस्तरीय त्वरित निर्णय घेण्यासाठी आमदार देवराव भोंगळे यांच्याकडून सकारात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील याप्रसंगी केली.
ऑल इंडिया जमीयतुल कुरेश चे अब्दुल रज्जाक कुरेशी,सय्यद रमजान अली, करीम कुरेशी, अन्सार कुरेशी, जावेद कुरेशी, शफिक कुरेशी, जुम्मा कुरेशी, बीराम कुरेशी, बब्बू कुरेशी, साजिद कुरेशी, जाकीर कुरेशी, तसलीम कुरेशी, परवेज कुरेशी, जुबेर कुरेशी, बाबू कुरेशी, वसीम कुरेशी, नासिर कुरेशी सह फार मोठ्या संख्येत कुरेशी बांधव उपस्थित होते.
ऑल इंडिया जमीयतुल कुरेश ने आपल्या निवेदनात सांगितले कि महाराष्ट्रातील कुरेशी समाज पारंपरिक व कायदेशीररित्या पशू व्यापार, वाहतूक व नियमाप्रमाणे खाण्यास योग्य असलेले तसेच ज्याच्यावर बंदी नाही अश्या जनावरांचे कत्ल व्यवसायात तसेच जनावरांच्या खरेदी विक्रीच्या व्यवसायात आहे. मात्र अलीकडे विविध ठिकाणी जातीय अत्याचार, बेकायदेशीर एफ. आय. आर., गोरक्षण केंद्रातुन जनावरे विक्री व चोरी होणे, पोलिस/गोरक्षक कारवाया, व्यापाऱ्यांना अत्यंत त्रास या प्रकारच्या घटनांमध्ये निरंतर वाढ झाली आहे ज्यामुळे समाजावर आर्थिक, सामाजिक, कायदेशीर व प्रतिष्ठेचा प्रचंड भार येत आहे, तसेच समाजाच्या अधिकारावर गदा आणला जात असून आर्थिक सामाजिक, मानसिक, त्रस्त समाजाने या बेकायदेशीर कृत्यांना त्रासाला कंटाळून आपला व्यापार बंद पुकारला आहे. त्यामुळे यातून महाराष्ट्रातील शेतकरी व्यापारी यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे व झाले आहे तसेच मास एक्स्पोर्ट च्या कंपन्या चे कामकाज ही बंद पडत आहे याचा मोठा फटका राज्याच्या तिजोरीला बसत आहे आणि या व्यवसायापासून आपला भारत देश जगात सरावात जास्त बीफ एक्स्पोर्ट करणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे परंतु सदरहू समाजावर आजही अन्याय सुरूच असून रास्त व कायदेशीर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर हा समाज खरीदी विक्री करणार नाही सदरहू कंपन्यांना माल देणार नाही.असे निर्णय घेण्यात आले असल्याचे देखील या प्रसंगी सांगण्यात आले.
कुरेशी समाजाच्या शिष्टमंडळाने 10 मागण्या या निवेदनाच्या माध्यमातून केल्या आहे,हे मात्र विशेष!
१. आर्थिक व्यवहार पारदर्शक करण्यासाठी APMC (कृषी उत्पन्न बाजार समित्या) ऑनलाइन प्रणालीचे अनिवार्याकरण. तसेच अ डिजिटल पेमेंट पॉर्टल, ऑनलाईन बाजार वेगण, स्लिप/पावतीचे संगणकीकरण आणि राज्यभर एकसमान सेस शुल्क व व्यापारी लाइसन्सची वेळेत वितरण करण्याच्या मागणीसह एकूण 10 मागण्या केल्या आहे.
सदरहू व्यवसाय हा देशाला जागतिक स्तरावर मान मिळवून देणारा व्यवसाय असून देशाला आर्थिकदृष्ट्या जागतिक स्तरावर मोठा करणारा व्यवसाय असून या व्यवसायाला विशेष महत्व आहे. व जिवनयापन करण्यासाठी परिवाराच्या तसेच कुटुंबाच्या पालन पोषणसाठी या कुरेशी व्यापाऱ्यांना लोन, परवाने, प्रशिक्षण, वाहतूक, परतफेड याबाबत एकाच कार्यालयातून सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्वरित निर्णय व्हावे अशी देखील मागणी केली असून आमदार देवराव भोंगळे यांनी यांनी कुरेशी समाजाच्या मागण्या शासन स्तरावर पोहोचवण्याची कुरेशी बांधवाना हमी दिली. तसेच आपल्या या मागण्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न माझ्याकडून करण्यात येईल व आपणास न्याय मिळावा या करिता मी विशेष प्रयत्न करणार अशी हमी आमदार देवराव भोंगळे यांनी दिल्याने कुरेशी समाजाने देखील त्यांचे आभार व्यक्त केले! वरील मागण्या लवकरात लवकर पूर्ण झाल्याशिवाय कुरेशी बिरादरी सुरक्षित होऊ शकणार नाही असे देखील या प्रसंगी सांगण्यात आले, हे मात्र विशेष!
सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर “व्यापार बंद व संविधानिक आंदोलन” सुरूच आहे. पुढे पुढे पाहू होणार तरी काय कुरेशी समाजाला केव्हा मिळणार न्याय? हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरीत आहे.
