कोल्हापूर जिल्हा हादरला, लग्नास नकार देणाऱ्या प्रेयसीचा खून करून प्रियकरांचीही आत्महत्या
चार महिन्यांपासून प्रेमाला झाली होती सुरुवात
सौ. कलावती गवळी (कोल्हापूर जिल्हा) प्रतिनिधी.
कोल्हापुरांत लग्नाला नकार दिल्याच्या रागांतून लिव्ह इनमधील असणाऱ्या प्रेयसीचा चाकूने भोसकून खून करून पळालेल्या प्रियकरांचीही गळफास घेवुन आत्महत्या ही घटना शाहूवाडी पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये घडली आहे, प्रियकर सतीश मारुती यादव (सध्या रा. शिवाजी पेठ कोल्हापूर मूळ रा. पेद्रेवाडी उंड्री ता. शाहुवाडी) याने तालुक्यातील माळापुडे-कातळेवाडी परिसरांत झाडाला गळफास घेवुन आत्महत्या केली हा प्रकार गुरुवारी (दि.५) सकाळी निदर्शनास आला, मंगळवारी (दि.3) सरनोबतवाडी येथील भाड्याच्या घरात प्रेयसी समीक्षा हिचा खून करून तो पळाला होता, याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून सतीश यादव आणि समीक्षा भारत नरसिंगे (वय 23) रा. कसबा बावडा, कोल्हापूर) हे दोघे गेल्या चार महिन्यांपासून लिव्ह इनमध्ये राहत होते, चार महिन्याचे प्रेम पण, या दोघांची प्रेम कहाणी अखेर लग्नापर्यंत येवुन पोहोचली होती, प्रियकर सतीश यादव याने तू माझ्याबरोबर आता लग्न कर असा आग्रह धरल्याने दोघांमध्ये सतत वाद सुरू होते, याच वादांतून त्याने मंगळवारी दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान चाकूने भोसकून समीक्षाचा खून केला, हल्ला करून तो समीक्षा तिच्या मैत्रिणीला घरात कोंडून दुचाकीवरून पळून गेला होता, बाजारभाव मार्गे तो शाहूवाडी तालुक्यांतील नांदारी येथील मित्राकडे गेला होता, पोलिसांनी मित्रासह त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती, गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह शाहूवाडी पोलीस ठाणेच्या हद्दीत माळापुडे-कातळेवाडी येथील जंगलात झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळला, त्याने बुधवारी सकाळीच गळफास घेवुन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली, या घटनेची नोंद शाहूवाडी पोलीस ठाण्यात झाली आहे
