आयपीएस अधिकारी अश्विनी सानप यांनी पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला
कर्तव्यनिष्ठ आणि मेहनती अधिकारी म्हणून ओळख
सौ. कलावती गवळी ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आला आहे, गृह विभागाने 50 हून अधिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या आदेश जारी केल्या असून त्यामध्ये पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त दर्जेंच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे, मुंबई पुणे पिंपरी चिंचवड नाशिक कोल्हापूर लातूर गडचिरोली भंडारा अहमदनगर या सह राज्यांतील विविध जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, लोहमार्गाचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सातारा पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाल्यापासून पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक पद हे चांगलेच रिक्त होते, अखेर या पदावर आयपीएस अधिकारी अश्विनी सानप यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या भारतीय पोलीस सेवेतील आयपीएस अधिकारी आहेत, त्या मुळाच्या कडेगांव पिंपळगावच्या असून कमवा आणि शिका या योजनेतून शिकून त्यांनी आयपीएस मध्ये यश मिळवले आहे, नुकताच त्यांनी पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत, आयपीएस अधिकारी अश्विनी सानप ह्या एक कर्तव्यनिष्ठ आणि मेहनती अधिकारी म्हणून ओळखल्या जातात
