एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

स्नेहबंधतर्फे नवनियुक्त निवासी उपजिल्हाधिकारी गिते यांचा सन्मान

स्नेहबंधतर्फे नवनियुक्त निवासी उपजिल्हाधिकारी गिते यांचा सन्मान .

प्रतिनिधी सारंग महाजन.

अहिल्यानगर- निवासी उपजिल्हाधिकारी पदी दादासाहेब गिते रुजू झाले आहेत. नवनियुक्त निवासी उपजिल्हाधिकारी गिते यांनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.उद्धव शिंदे यांनी गिते यांचा सन्मान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील मोहरी गावचे भूमिपुत्र असलेले दादासाहेब गिते यांची वाटचाल प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करणाऱ्या प्रत्येक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. साधारण शेतकरी कुटुंबातुन पुढे येत अभ्यास आणि चिकाटीच्या जोरावर दादासाहेब गिते महाराष्ट्र्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेद्वारे राज्यसेवेत दाखल झाले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा, राहुरी, शेवगाव येथे तहसीलदार म्हणून गिते यांनी कामकाज पाहिले तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेचे तहसीलदार या पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली.
जिल्हा प्रशासनात विविध पदांवर प्रदीर्घकाळ काम केल्याचा अनुभव गिते यांच्या गाठीशी आहे. जिल्ह्याचे मूळचे भूमिपुत्र असल्याने जिल्ह्याच्या भौगोलिक आणि सामाजिक परिस्थितीची जाण त्यांच्याकडे आहे. निवासी उपजिल्हाधिकारी सारख्या महत्वाच्या पदावर काम करतांना गिते यांना हा अनुभव उपयोगी पडेल तसेच जिल्हा प्रशासनाचे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान होण्यासाठी देखील गिते यांचा अनुभव उपयोगी सिद्ध होईल, असे प्रतिपादन अध्यक्ष डॉ.उद्धव शिंदे यांनी केले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link