एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आकाश सीता उद्धव पनाळे केंद्रीय सशस्त्र पोलिस बल मध्ये झाला assistant commandant (ACP)

सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आकाश सीता उद्धव पनाळे केंद्रीय सशस्त्र पोलिस बल मध्ये झाला assistant commandant (ACP)

लातूर प्रतिनिधी अमोल गोरे

लातूर :- हरंगुळ (बु.) येथील अल्पभूधारक आणि अत्यंत सामान्य परिस्थिती असलेल्या एका शेतकऱ्याचा मुलगा नुकत्याच लागलेल्या UPSC च्या निकालात देशात २२८ वा क्रमांक घेऊन CAPF (केंद्रीय सशस्त्र पोलिस बल) मध्ये assistant commandant (ACP) या पदासाठी त्याची निवड झाली आहे.
उद्धव प्रल्हाद पनाळे हे एक सामान्य अल्पभूधारक शेतकरी असून त्यांनी शेती व ड्रायव्हरची नोकरी करून आपल्या मुलांना शिक्षण दिले. त्यांचा मुलगा आकाश उद्धव पनाळे याचे प्राथमिक शिक्षण हरंगुळ (बु.) गावातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत झाले असून माध्यमिक शिक्षक ही गावातीलच कै. यशवंतराव पाटील विद्यालयात झाले. महाविद्यालयीन शिक्षण लातूर येथील राजश्री शाहू महाविद्यालय व दयानंद महाविद्यालय येथे झाले आहे.
यूपीएससी ची तयारी आकाश याने पुणे येथे केले असून त्याचा हा तिसरा प्रयत्न आणि दुसरी मुलाखत होती. या अगोदर आकाश पनाळे यांने १ UPSC mains, २ राज्यसेवा मेन्स, आणि १ CDS SSB मुलाखत दिली आहे. आकाश याने अतिशय जिद्दीने अभ्यास करून कुठेही खचून न जाता सतत प्रयत्नशील राहून हे यश संपादन केले आहे.
UPSC CAPF ची परीक्षा दर वर्षी ऑगस्ट महिन्यात होते. ज्यामध्ये लाखोंच्या संख्येने परीक्षेसाठी फॉर्म येत असतात.
२०२४ मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये आकाश याने परीक्षा दिली होती. आकाश उद्धव पनाळे याने दिलेल्या परीक्षेचा दिनांक १३ जून २०२५ रोजी निकाल जाहीर झाला आहे.

 

या लागलेल्या UPSC च्या निकालानुसार आकाश उद्धव पनाळे हा देशात २२८ वा क्रमांक घेऊन CAPF म्हणजेच केंद्रीय सशस्त्र पोलिस बल मध्ये assistant commandant (ACP) या पदासाठी पात्र होऊन त्याची निवड झाली आहे.
त्याच्या या निवडीने पनाळे कुटुंबीय आणि संपूर्ण ग्रामस्थ आनंदी झाले असून त्याच्या यशाचे सर्वत्र अभिनंदन होत असून आकाश पनाळे याच्या आई-वडिलांचे आणि बंधू कृष्णा पनाळे यांचेही कौतुक होत आहे.
आकाश ने मिळविलेल्या या यशाबद्दल लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी आकाशचा शाल श्रीफळ व ज्ञानेश्वरी भेट देऊन सन्मान व अभिनंदन करून पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. तसेच आकाश ची आई सौ सीताबाई आणि वडील उद्धव पनाळे यांचा शाल श्रीफळ देऊन त्यांचा कौटुंबिक व पारिवारिक सत्कार केला.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

पुणे येथे वाहतूक संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रिक्षा चालकांच्या विविध ज्वलंत समस्या व अडचणी संदर्भात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात लेखी निवेदन सादर करण्यात आले

Read More »

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link