एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

प्रतिनिधी विशाल आडगळे

शिवशंभु प्रतिष्ठान कात्रज पुणे संस्थापक अध्यक्ष महेश भाई कदम, माय माऊली केअर सेंटर कात्रज विठ्ठलराव वरुडे पाटील व वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज पुणे विशाल अडागळे यांच्या सौजन्याने व पुढाकाराने आज गुरुवार दिनांक 12 जून 2025 रोजी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत दत्त मंदिर समोर दत्तनगर कात्रज – गुजरवाडी रोड कात्रज या ठिकाणी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजित करण्यात आले होते. या साठी प्रमुख उपस्थिती म्हणून शिबिराचे उद्घाटन भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक (गुन्हे) मा. श्री राहुल खिलारे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

 

तसेच स्वतः मा श्री राहुल खिलारे यांनी रक्तदान करून रक्तदान शिबिरास सुरुवात देखील केली. या आयोजित केलेल्या शिबिरामध्ये प्रामुख्याने रक्तदान, डेंटल तपासणी, नेत्र तपासणी, जनरल ओपीडी मध्ये चिकित्सा, बीपी, शुगर, ब्रेस्ट कॅन्सर सारखे महिलांचे आजार यावर तपासण्या करून व खालील हॉस्पिटलमध्ये उपचाराच्या उपाययोजना करण्यात आलेल्या असून त्यामध्ये प्रामुख्याने एचपी देसाई मोहम्मदवाडी, भारतीय विद्यापीठ हॉस्पिटल तसेच ताराचंद हॉस्पिटल यांनी पुढाकार घेतला.
या आरोग्य शिबिरामध्ये शेकडो नागरिकांनी तपासण्या करून घेण्यासाठी सहभाग नोंदवला. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक बक्षीसही देण्यात आली व परिसरातील दत्तनगर जाधव नगर भारत नगर मित्र मंडळांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link