– संभाजी पुरी गोसावी, सातारकर
शनिवारी सकाळी ड्युटीवरून घरी जात होतो. वाटेत सहजच एक पेपर विकत घेतला – पुणे लोकमत. तेव्हा अचानक “पोलिस टाईम्स” या जुन्या, परिचित वृत्तपत्राची आठवण झाली. अनेक वर्षांनंतर पुन्हा तो पेपर हातात आला आणि मी लगेच तो खरेदी केला.
लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. शालेय जीवनात दररोज सकाळी वर्तमानपत्र वाचणे ही सवयच बनली होती. त्याच वाचनसवयीमुळे मला माहितीविश्वात रस निर्माण झाला आणि आज मी महाराष्ट्र प्रशासनासमोर उभा राहिलो आहे.
मी अत्यंत गरिब कुटुंबातून आलो असून शालेय शिक्षण अपूर्ण राहिले आहे. तरीसुद्धा 2017 पासून पोलीस आणि महसूल प्रशासनात माझा चांगला जनसंपर्क निर्माण झाला.
“पोलिस टाईम्स” वाचताना अनेक घटना मन हेलावून टाकणाऱ्या होत्या. महाराष्ट्रात गुन्हेगारी किती प्रमाणात वाढत चालली आहे हे स्पष्टपणे समजले.
माध्यमे केवळ माहिती देत नाहीत, तर समाजात जागरुकता निर्माण करतात. “पोलिस टाईम्स” सारखी वृत्तपत्रे हेच काम करत आहेत – प्रशासनाला, पोलिस यंत्रणेला आणि सामान्य जनतेला सजग करत आहेत.
