एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

सर्वसामान्यांना परिपूर्ण वैद्यकीय सुविधेसाठी शासनामार्फत विविध सुविधांवर भर

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

प्रतिनिधी सतीश कडू नागपूर

सर्वसामान्यांना परिपूर्ण वैद्यकीय सुविधेसाठी शासनामार्फत विविध सुविधांवर भर

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

▪️शासकीय दंत रुग्णालयातील
अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर व सिम्युलेशन लॅबचे उद्घाटन

नागपूर,दि. 31 : सर्वसामान्य जनतेला परिपूर्ण वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी शासनामार्फत विविध सेवा सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिल्या जात आहे. नागपूर मधील विविध शासकीय रुग्णालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आपण वैद्यकीय सुविधांचे अनेक प्रकल्प हाती घेतले असून शासकीय दंत रुग्णालयातील ही अत्याधुनिक शस्त्रक्रियागृहाची अर्थात मॉड्युलर ऑपरेशन थिएटरची राज्यातील पहिली उपलब्धी असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

येथील शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या अत्याधुनिक शस्त्रक्रीया गृहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अर्थ राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागीय संचालक डॉ. राज गजभिये, अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर, विभाग प्रमुख डॉ. प्रशांत पंदीलवार आदी उपस्थित होते.

*अशा आहेत सुविधा*
नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटरमध्ये लॉमीनार ऐअर फ्लो सारखे जीवाणू आणि धुळ कमी ठेवणारी यंत्रणा असल्याने निर्जंतुकीकरण सोपे झाले आहे. यात भविष्यातील गरजेप्रमाणे आवश्यकते बदल केव्हाही करता येऊ शकतात. सुरक्षिततेसाठी असलेली आंतरराष्ट्रीय मानके लक्षात घेऊन या नवीन ऑपरेशन थिएटरमध्ये सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.

*सिम्युलेशन लॅब*
सिम्युलेशन लॅबमध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था आहे. यामुळे त्यांना प्रत्यक्ष अनुभव आपल्या कौशल्यात वृध्दी करुन घेता येईल. देशातील अत्याधुनिक अशी पहिली सिम्युलेशन लॅब म्हणून याकडे पाहिले जात आहे. वैद्यकीय शिक्षणाच्या दृष्टीने ही नवी उपलब्धी करुन देण्यात आली आहे. यात आवश्यक तेवढे एक्स-रे आणि दंत प्रक्रिया शिकण्यास मदत होईल. विशेषत: येथील आधुनिक उपकरणाच्या मदतीने टायपोडोन्ट दातांवर थ्रीडी तंत्रज्ञानाद्वारे आधुनिक उपचार पध्दती शिकविली जात आहे.
00000

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link