संभाजी पुरीगोसावी : अखेर नवल किशोर राम पुणे महापालिका आयुक्तपदी, राज्यांत आठ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या..!! संभाजी पुरीगोसावी प्रतिनिधी. महाराष्ट्र प्रशासनात मोठा खांद्यापालट झाला असून राज्य सरकारने आठ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी बदली म्हणजे नवल किशोर राम यांची पुणे महापालिका आयुक्तपदी झालेली नियुक्ती होय, या आदी पंतप्रधान कार्यालयात प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेले नवल किशोर राम आता पुन्हा एकदा पुणे शहरांच्या प्रशासनाची धुरा सांभाळणार आहेत. नवल किशोर राम हे 2008 तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत मुळचे बिहार राज्यांतील चंपारण जिल्ह्यातील मोतीहार गावचे रहिवासी आहेत त्यांची प्रशासकीय कारकीर्द ही नांदेड जिल्ह्यापासून सुरुवात झाली त्यानंतर त्यांनी यवतमाळ जिल्हा परिषदेत दोन वर्ष कार्य केले, त्यानंतर जिल्हाधिकारी बीड आणि औरंगाबाद (आत्ताचे छत्रपती संभाजीनगर ) त्यांनी जबाबदारी पार पडली आहे.2020 पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना कोविड-19 महामारीच्या काळात त्यांनी अत्यंत सक्रिय भूमिका घेतली होती. गावोगावी जावुन प्रत्यक्ष पाहणी आणि निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्याची देशपातळीवर दखल घेण्यात आली होती त्यामुळे त्यांना देशातील सर्वोत्तम जिल्हाधिकाऱ्यांपैकी एक मानले गेलं त्यानंतर त्यांची नियुक्ती थेट पंतप्रधान कार्यालयात उपसचिव पदावर करण्यात आली होती. डॉ. राजेंद्र भोसले यांच्या निवृत्तीनंतर पुणे महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी नवल किशोर राम यांच्याकडे देण्यात आले आहे. पुणे महापालिकेसारखा महत्त्वाच्या शहरी संस्थेचे नेतृत्व करणे ही एक मोठी जबाबदारी मानली जाते. महानगरात विकास प्रकल्प,नागरी सेवा आणि पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी प्रभावी प्रशासन आवश्यक असते. पुढील प्रमाणे अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापना… (नवल किशोर राम आयुक्त, पुणे महापालिका) (शितल तेली उगले आयुक्त, क्रीडा पुणे) (भाग्यश्री विसपुते जिल्हाधिकारी धुळे) (आनंदी भंडारी सिईओ, जिल्हा परिषद अहिल्यानगर) (आशिष येरेकर जिल्हाधिकारी अमरावती.) (सौरभ कटियार जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर) (चंद्रकांत डांगे सहसचिव, मुख्य सचिव कार्यालय)(जे.एस. पापळकर विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर)
