संपादकीय | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. पुणे : बाणेर पोलिसांना मिळालेल्या माहिती नुसार बाणेर पोलीस स्टेशनं हद्दीमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालत असल्याची गोपनीय माहीती मिळाली असता दिनांक ०८मे२०२५ रोजी “वेदाथायरया.” सिग्नेट कॉर्नरकोटक महिंद्रा बँकेच्या शेजारी बालेवाडी फाटा बाणेर, पुणे येथे बनावट ग्राहक पाठवून खात्री करुन छापा टाकण्यात आला असता सदर ठिकाणी वेश्या व्यवसाय चालु असल्याचे अढळुन आल्याने छापा टाकुन कारवाई करण्यात आली त्यामध्ये १) स्पा मॅनेजर मोहीमुद्दील अहमद अली, वय २२ वर्षे, रा- वेदाथाय स्पा सिग्नेट कॉर्नरकोटक महिंद्रा बँकेच्या शेजारी बालेवाडी फाटा बाणेर पुणे २) स्पा मालकीण व ३) जागा मालक यांच्या वर बाणेर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८५/२०२५ अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंधकायदा १९५६ चे कलम ३,४,५, व बी.एन. एस. कलम १४३.३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयामध्ये स्पा मॅनेजर मोहीमुद्दील अहमद अली यास अटक करण्यात आली आहे.यातील आरोपी पैकी अ.क्र. ०१ व ०२ यांनी यातील ०३ पिडीत महिला यांना वेश्या व्यवसाया करिता प्राप्त करुन घेऊन पैशांचे अमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करुन स्पाच्या नावाखाली त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेऊन तसेच अ.क्र. ०३ याने आपली स्वतःच्या मालकीची जागा वेश्या व्यवसायासाठी उपलब्ध करुन देवून त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजिवीका भागवित असताना मिळून आले म्हणुन सरकारतर्फे सदर इसमांविरुध्द अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधकायदा १९५६ चे कलम ३,४,५, व बी.एन.एस. कलम १४३, ३(५) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. कोणत्याही अस्थापनेच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणा-या विरुध्द कारवाईच्या मोहीमेमध्ये व्यवसाया संबधीत व्यवसाय चालक तसेच वेश्या व्यवसायासाठी जागा उपलब्ध करुन देणा-या जागेचे मालक याच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परि.४, पुणे शहर श्री. हिमंत जाधव, मा. सहा. पोलीस आयुक्त खडकी विभाग, पुणे शहर, श्री. विठ्ठल दबडे यांचे सुचने व मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. चंद्रशेखर सावंत, म. पोलीस उप-निरीक्षक दिपाली पाटील, पोलीस उप-निरीक्षक अविनाश कराड, तसेच पोलीस अंमलदार भोरे, शिंगे, आहेर, पाथरुट, काळे, धस, इंगळे, बोराटे, चालक बर्गे म. पोलीस अंमलदार मिसाळ, यांनी केली आहे.
