एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैदयांची राष्ट्रभक्ती

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात

नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैदयांची राष्ट्रभक्ती
दिनांक ९ मे २०२५

प्रतिनिधी सतीश कडू नागपूर

नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे रामचंद्र प्रतिष्ठाण, दादर, मुंबई या संस्थेच्या वतीने नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे दिनांक 15 मार्च 2025 ते 31 मार्च 2025 या कालावधीत नागपूर मध्यवर्ती कारागृहातील बंदयांसाठी राष्ट्रभक्तीची भावना वाढीस लागावी यासाठी निबंध स्पर्धेचे आयोजन रामचंद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.अशोक शिंदे, यांनी केले होते. त्याचा पारितोषिक वितरण कार्याक्रमाचे आयोजन दिनांक 09/05/2025 रोजी नागपूर मध्यवर्ती कारागृह,नागपूर येथे करण्यात आले. यामध्ये नागपूर मध्यवर्ती कारागृहातील सिध्दोष बंदी अश्विण विठ्ठल मेश्राम यास प्रथम क्रमांकांचे बक्षीस रुपये 1000/- व प्रमाणपत्र देण्यात आले.द्वितीय क्रमांक बक्षीस रुपये 750/– विनोंद जंगलूजी भाकरे , तृतीय क्रमांक बक्षीस रुपये 500/– तुषार दामोधर बंगेरा तसेच उत्तेजनार्थ बक्षीस रुपये 250/- व प्रमाणपत्र ,सिध्दार्थ प्रल्हाद चिमने, हितेश रामभाऊजी राऊत, पवन अरविंद डोमकोंडवार, रंजन लक्ष्मण रामनाथकर यांना तसेच निबंध स्पर्धेमध्ये सहभागी सर्व बंदयाना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

बंदयांना मार्गदर्शन करतांना कारागृह अधीक्षक श्री. वैभव सु.आगे यांनी बंदयांनी राष्ट्रभक्ती एकमेकाशी प्रेमाने वागणे, आपला परिसर स्वच्छ ठेवणेपासून राष्ट्रभक्तीची सुरवात होते असे सांगितले. बंदयांनी राष्ट्रभक्ती विषयक निबंध लिहतांना आपला देश व स्वातंत्र्य सैनीक यांचेकडून आपण कोणती प्रेरणा घेतली हे लिहणे आवश्यक आहे. असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे बक्षीसवितरण प्रसंगी श्री अशोक शिंदे यांनी कारागृहातील बंदयामध्ये राष्ट्रभक्ती ची भावना वाढीस लागावी यासाठी दरवर्षी निबंध स्पर्धेचे आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात येते असे सांगीतीले बंदयांनी कारगृहामध्ये राहून भावना वृध्दींगत करता येते असे सांगितले.
निबंध स्पर्धेमध्ये रामचंद्र प्रतिष्ठान यांनी स्वांतत्र्यांसाठी योगदान देणारे क्रांतीकारक तसेच देशभक्तीचे महत्व व्यक्त करण्यासाठी बंदयांना प्रेरक विषय दिले होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कारागृह अधीक्षक श्री.वैभव आगे, अति.अधीक्षक, श्रीमती दिपा वै.आगे, उप अधीक्षक, श्री.श्रीधर काळे, वरिष्ठ तुरूंगाधिकारी श्री.आनंद पानसरे, श्री. भिमराव राऊत, श्री.विजय हिवाळे, श्री. नरेद्रकुमार अहिरे, तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.लक्ष्मण साळवे, कारागृह शिक्षक, यांनी केले यावेळी इतर कारागृह अधिकारी / कर्मचारी हजर होते

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

पुणे येथे वाहतूक संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रिक्षा चालकांच्या विविध ज्वलंत समस्या व अडचणी संदर्भात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात लेखी निवेदन सादर करण्यात आले

Read More »

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link