अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
जलतरण क्षेत्रात कु.अंजना प्रधान हिस नाशिक जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी:-श्री रमेश सुरशे(छत्रपती संभाजीनगर)
१मे २०२५ महाराष्ट्र दिनी
नाशिकच्या पोलीस ग्राउंडवर,”जिल्हा क्रीडा पुरस्कार” मा.गिरीशजी महाजन यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. अंजनानाने आपल्या अपंगत्वावर मात करत जलतरण या क्षेत्रात अनेक पदके प्राप्त केली आहेत,त्याचाच हा गौरव !!
आपल्या अपंगत्वावर मात करत जिद्धीने स्विमिंग खेळात सहभागी होत आपले नाव लौकिक केले. तिने फक्त पोहने
न शिकता सातत्याने वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेऊन यश खेचून आणणे व मेडल्स मिळवणे आता अंजनाचा छंदच झाला आहे. अंजनाला स्विमिंग साठी मा.घनश्याम कुवर सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. स्पर्धेत भाग घ्यायला प्रोसाहन देणे व त्यासाठी कसून नियमित सराव करून घेतल्यामुळे आणि सातत्य ठेवल्यामुळे अंजनाला स्विमिंग च्या स्पर्धेत यश मिळत गेले.आपल्या स्विमिंग कोच बद्दल कायम नतमस्तक होऊन म्हणते चांगले गुरुवर्य मिळणे हे माझं भाग्य आहे.
अंजनाला सायली पोहरे,सुनील पोहरे,संगिता सुनील पोहरे, संदीप भानोसे, सागर बोडके, सक्षम संस्था, रॉयल रायडर्स ग्रुप,राणी खेडीकर, शिवुर्जा प्रतिष्ठान,
दादासाहेब काळे,अभय पाटील,रमेश सुरशे, महेश साळुंके,पत्रकार लोखंडे सर, सुखदेव खुर्दळ,अर्चना पाटील, उज्ज्वला गुरुसूडकर, संगीता दासगुप्ता,प्रहार संघटना, रवींद्र टिळे, संतोष मानकर यांचे मार्गदर्शन, व प्रोत्साहन व मदत लाभत असते.समाज,प्रसिद्धी माध्यम, सामाजिक संस्था,नातेवाईक, मित्रपरिवार,या सगळ्यांकडून अंजनाचे कौतुक होत आहे.
