पुलकिंत सिंग यांनी चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला,
चंद्रपूर जिल्ह्यात नेहमीच प्रयत्नशील राहणार…!
संभाजी पुरीगोसावी (चंद्रपूर जिल्हा ) प्रतिनिधी.
राज्यात दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या, यामध्ये अनेक जिल्ह्यात जिल्हाधिकारी तर सीईओ काही अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली आहे, यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जी.जॉनसन यांचे बीड जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या रिक्त जागेवर पुलकिंत सिंग यांनी चंद्रपूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे, ते यापूर्वी जालना जिल्हा अंबड येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते, पुलकिंत सिंग यांनी मावळते सीईओ विवेक जी. जॉनसन त्यांच्याकडून पदभार घेताच चंद्रपूर जिल्ह्यात मी नेहमीच प्रयत्नशील, राहणार असे त्यांनी पत्रकार परिषद माहिती दिली, यावेळी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले, यावेळी त्यांनी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची जिल्हा परिषद मुख्य कार्यालयात आढावा बैठक घेतली
