संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाचा तीव्रता वाढत असून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी याकरिता टिळेकर नगर कोंढवा पुणे येथे महावीर स्वामी जल कुंभ पाणपोईचे उद्घाटन भाजपा जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक भाजपा जैन प्रकोष्ठ पुणे शहर युवा प्रमुख मयूर सरनोत( वरवंडकर), विनोद सोलंकी, राजेश सालेचा, अभिजीत शहा, सुयोग शहा, निखिल मंडलेचा, शुभम अब्बाड, आदि यावेळी उपस्थित होते,
