घरफोडी करणारे दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद; चार गुन्हे उघडकीस, ४ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त – आंबेगाव पोलीसांची यशस्वी कामगिरी
प्रतिनिधी: गोपाळ भालेराव
पुणे – आंबेगाव परिसरात झालेल्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावत आंबेगाव पोलिसांनी दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून ४,६६,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, त्यांच्यावर एकूण चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
दिनांक १६ मार्च २०२५ रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास संतोषीमाता मंदिराजवळील तिरुपती कॉलनी येथे घरफोडी झाली होती. या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४५/२०२५ दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आयुष संजय खरात (वय २०, रा. सुखसागर नगर, पुणे) आणि आर्यन कैलास आगलावे (वय १९, रा. गोकुळनगर, पुणे) यांना अटक केली.
या आरोपींकडून खालील गुन्हे उघडकीस आले:
१. आंबेगाव पोलीस ठाणे – गुन्हा रजि क्र. ४५/२०२५
२. भारती विद्यापीठ पोलीस ठाणे – गुन्हे रजि क्र. १९७/२०२५ आणि १०२५/२०२५
३. मार्केटयार्ड पोलीस ठाणे – गुन्हा रजि क्र. ६९/२०२५
जप्त मुद्देमालामध्ये –
२२ ग्रॅम सोन्याचे दागिने, ४ लॅपटॉप, एक मोटारसायकल, एक रिक्षा असा एकूण ४,६६,०००/- रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आरोपी आर्यन आगलावे हा कोंढवा आणि मार्केटयार्ड येथील घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये देखील फरार होता.
सदर तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
या कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी:
मा. अमितेश कुमार (पोलीस आयुक्त, पुणे), मा. रंजनकुमार शर्मा (सह पोलीस आयुक्त), मा. मनोज पाटील (अप. पोलीस आयुक्त, पश्चिम विभाग), श्रीमती स्मार्तना पाटील (पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २), श्री. राहुल आवारे (सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग), तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, सपोनि प्रियंका गोरे, पोउनि मोहन कळमकर, पो.अं. शेलेंद्र साठे, हनमंत मासाळ, चेतन गोरे, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, प्रमोद भोसले, सुभाष मोरे, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी पार पाडली.
