औरंजेबाची कबर हटविण्याच्या मागणीसाठी विहिंप व बजरंगदल चे तहसीलदारांना निवेदन…
प्रतिनिधी.नामदेवराव.मंडपे.मंठा
मंठा:-कुरकर्मा औरंजेबाची कबर शासनाने हटवावी, नसता आम्ही हटवतो, असा ईशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने मंठा तहसील येथे आंदोलनप्रसंगी दिला आहे.औरंगजेबाच्या कबरीबाबत उद्भवलेल्या विषयाच्या अनुषंगाने आज सोमवारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार घालून व मंठा तहसिल कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, औरंगजेब हा हिंदुव्देष्टा होता. त्यामुळे त्याची कबर हटविणे आवश्यक आहे. त्याने केलेले अन्याय-अत्याचार आजही हिंदु विसरेलेले नाहीत. शिख धर्मगुरूंची त्याने केलेली हत्या आणि हिंदु मंदीरांवर केलेले हल्ले लक्षात घेता त्याच्या कबरीची आपल्याला कुठलीही गरज नाही. त्याने काशी येथे विश्वेश्वर मंदीरावर हल्ला करून मथुरेतील मंदीरांचा उध्दवंस केला आहे. अनेक हिंदूंची त्याने हत्या केली असून, छत्रपती संभाजीमहाराजांना दिलेल्या मरणयातना आजही हिंदू विसरलेले नाहीत. त्यामुळे त्याची कबर नष्ट होणे आवश्यक असून, त्याबाबत योग्य वेळेत निर्णय न घेतल्यास विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल संभाजीनगरकडे कूच करेल आणि ही कबर नष्ट करतील, असा ईशारा या निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे. या निवेदनावर विश्व हिंदू परिषदेचे राधाकिसन बोराडे,डिगंबर मुळे,आसाराम काकडे,संदीप गायकवाड, संजय गायकवाड, सतीशराव निर्वळ, सुदर्शन बोराडे,अमोल वरकड, भक्तीराम बोराडे, विशाल राठोड, नरेश सांगोळे, बोराडे ज्ञानेश्वर, वैभव बोराडे,राहुल चव्हाण,किरण सोनार,कृष्णा बोराडे,सुमित जोशी,सखाराम बोराडे,योगेश बोराडे, स्वप्नील देशमुख, सचिन गुजर,संतोष तिवारी,पांडुरंग पारखे,अंजीराम डाके,उमेश पीसे, वैभव काळे, पवन जाधव,सौरभ चाकरे, शिवहारी,स्वप्नील घारे,बाळासाहेब खरात यांच्या स्वाक्षन्या आहेत.
