एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

लोकाभिमुख, गतिमान व पारदर्शक प्रशासनासाठी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाला प्रथम क्रमांक

लोकाभिमुख, गतिमान व पारदर्शक प्रशासनासाठी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाला प्रथम क्रमांक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांना दिले अभिनंदन पत्र

नागपूर,दि. 27 : सर्वसामान्यांचे शासनाशी असलेली कामे सुखकर पध्दतीने पार पडावीत, प्रशासन लोकाभिमुख, तत्पर, व पारदर्शी असावे यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर देऊन 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशाअंतर्गत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांनी या मोहीमे अंतर्गत जिल्ह्यातील प्रशासकीय कार्यालयीन सुधारणांबाबत सादरीकरण केले होते. राज्यपातळीवर व्यापक आढावा बैठकीत प्रत्येक जिल्ह्याच्या सादरीकरणाचा आढावा घेऊन नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयास राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना अभिनंदन पत्र देऊन त्यांचे व सर्व टिमचे अभिनंदन केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वाखाली नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक कल्पक विकास योजना राबविल्या जात आहेत. यात सर्वसामान्यांना चांगल्या आरोग्य सुविद्या मिळाव्यात यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांमधील विविध अत्याधूनिक यंत्रणा व सुविधांची उभारणी, ॲग्रीस्टॅक व इतर कृषी योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी योजनांच्या सुविधा, आंतरराष्ट्रीय प्रवासी व माल वाहतूक हब, विमानतळ अर्थात मिहान प्रकल्पाला चालना, खनिकर्म विकास, वन व पर्यटन, हॉटेल इंडस्ट्री, पशुसंवर्धन, कौशल्य विकास व प्रशिक्षण, सेवा क्षेत्र अशा सर्व क्षेत्रात अधिकाधिक सुधारणासाठी जिल्हा प्रशासनातील सर्व टिम एकसंघ भावनेने कार्यरत आहे. या सर्वांच्या सहकार्यातून व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनातून अधिक जबाबदार प्रशासन देण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. नागपूर जिल्हा प्रशासनाला मिळालेला हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार सर्वांच्या सहकार्याचे प्रतिक आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link